मुलीची छेड काढल्यामुळे वडिलाने केली मुलाची हत्या

मुलीच छेड काढणाऱ्या तरुणाची त्याच्या वडिलांनी हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात घडली आहे.

Amroha
The man murder of his wife for three hundred rupees in beed
बीडमध्ये ३०० रुपयांच्या हिशेबावरुन वाद

दारुच्या नशेत शेजारी राहणाऱ्या मुलीशी गैरवर्तन केल्यामुळे संतापलेल्या वडिलाने १८ वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील तरौली गावात घडली आहे. पोलिसांनी आरोपी वडिलाला अटक केले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राग अनावर झाल्यामुळे त्याच्याकडून मुलाची हत्या झाली. राग थंड झाल्यावर त्याला ही बाब कळली तेव्हा त्याने मुलाच्या मृत्यूचा बनाव केला. परंतु, पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यानेच हत्या केल्याची बाब उघड झाली.

काय आहे नेमके प्रकरण?

मुलाची हत्या करणाऱ्या वडीलाचे नाव गिरीश गुर्जर असे आहे. आरोपीचा १८ वर्षीय मुलगा दारु पिवून शेजारच्या घरातील मुलीला त्रास देत होता. त्याने तिचा विनयभंग केला. या गोष्टीची माहिती आरोपीला मिळाली. त्याने शेजारच्या मुलीच्या घरात जाऊन त्याला मारझोड केली. त्यानंतर स्वत:च्या घरात आणले. संतापात त्याने घरातील फावडा मुलाच्या मानेवर टाकला. त्यामुळे मुलगा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. राग शांत झाल्यावर आरोपीच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. त्यानंतर त्याने शेजारच्या घरात मृतदेह टाकला आणि शेजारच्याने आपल्या मुलाची हत्या केल्याचा बनाव केला. पोलिस घटानस्थळी दाखल झाल्यानंतर त्याने शेजारच्यावर आरोप केले. मात्र, शोजारच्याने सर्व घटना सांगितली. पोलिसांनी पूर्ण तपास केला. घरात आणि आरोपीच्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळले. त्यामुळे त्याचा बनाव खोटा ठरला. त्यामुळे पोलिसांनी आरोपीस अटक केले.


हेही वाचा – नागपूर: विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य; आरोपीस जाळण्याचा प्रयत्न