‘ये रे ये रे पैसा २’चा टीजर सोशल मीडियावर लाँच

'अण्णा परत येतोय', अशी कॅची टॅगलाईन घेऊन उत्सुकता निर्माण केलेल्या 'ये रे ये रे पैसा २' या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून टीजरमधून या चित्रपटात वेगवान कथानक पहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

'Ye Re Ye Re Paisa 2': Hemant Dhome's upcoming film's teaser to be released on this date
बहुचर्चित 'ये रे ये रे पैसा २'चा टीजर सोशल मीडियावर लाँच

अण्णा परत येतोय‘, अशी कॅची टॅगलाईन घेऊन उत्सुकता निर्माण केलेल्या ये रे ये रे पैसा २या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. अमेय खोपकर निर्मित या बिगबजेट चित्रपटाचे जवळपास ९० टक्के चित्रीकरण लंडनमध्ये झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

बिगबजेट चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण लंडनमध्ये

ये रे ये रे पैसाया चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. गुंतवून ठेवणारे कथानक, दमदार विनोद, उत्तम स्टारकास्टमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांना डोक्यावर घेतले. आता लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमेने या चित्रपटाला ये रे ये रे पैसा २च्या रुपात पुढे नेले आहे. संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार आणि स्मिता गोंदकर असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. तसेच बिगबजेट चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण हे लंडनमध्ये करण्यात आले असून टीजरमधून या चित्रपटात वेगवान कथानक पहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. अण्णा परत आल्याने आता काय धमाल उडणार याचे उत्तर चित्रपटातच मिळेल.


हेही वाचा – ‘ये रे ये रे पैसा २’ हा लवकर प्रेक्षकांच्या भेटीला