घरदेश-विदेशसिने अभ्यासक विजया मुळ्ये यांचे निधन

सिने अभ्यासक विजया मुळ्ये यांचे निधन

Subscribe

हिंदी सिनेसृष्टीत 'अक्का' या नावाने प्रसिद्ध असलेल्या सिने अभ्यासक, निर्मात्या विजया मुळ्ये यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

हिंदी सिनेसृष्टीत ‘अक्का’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या सिने अभ्यासक, निर्मात्या विजया मुळ्ये यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या ९८ वर्षाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेसृष्टीच्या थोर अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अक्का यांच्या कन्या आणि अभिनेत्री सुहासिनी मुळ्ये यांनी विजया मुळ्ये यांच्या निधन झाल्याचे ट्विट केले आहे. विजया मुळ्ये यांनी रविवारी सायंकाळी ४.४५ वाजता एस्कॉर्ट रुगणालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी १० वाजता नवी दिल्लीतील लोधी रोडवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

विजया मुळ्ये यांच्याविषयी

सिने अभ्यासक, निर्मात्या विजया मुळ्ये यांना कोणताही आजार झालेला नव्हता. मात्र वाढत्या वयामुळे त्या अशक्त झाल्या होत्या. त्यात त्यांनी खाणंही कमी केले होते. विजया मुळ्ये यांच्या पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला होता. त्यांनी पटणा फिल्म सोसायटीचीही स्थापना केली होती. मुंबई सेन्सॉर बोर्डाच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांना राष्ट्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या डॉक्युमेंट्रीजचीही निर्मिती केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -