घरट्रेंडिंग'या' वृत्तपत्राने 'सोशल डिस्टन्सिंग' बद्दल प्रसिद्ध केली अनोखी जाहिरात!

‘या’ वृत्तपत्राने ‘सोशल डिस्टन्सिंग’ बद्दल प्रसिद्ध केली अनोखी जाहिरात!

Subscribe

सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगण्यासाठी जाहिरात केली प्रसिद्ध

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी, जगभरातील आरोग्य तज्ज्ञांनी लोकांना एकमेकांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे, तर युरोपियन देश फिनलँडमधील एका वर्तमानपत्राने सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी एक वेगळा प्रयोग करून अनोखी जाहिरात प्रकाशित केली आहे. ही जाहिरात वाचक वृत्तपत्रापासून कमीतकमी ६ फूट अंतरावर असतील तरच योग्य रीतीने वाचू शकतील.

- Advertisement -

वर्तमानपत्रात अनोखी जाहिरात झाली प्रसिद्ध

कोरोना व्हायरसपासून संरक्षण व्हावे, यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एक पर्याय सांगितला जात आहे तर या जीवघेण्या व्हायरसपासून लोकांना जागरूक करण्यासाठी प्रशासन प्रसार माध्यमाचा आधार घेत आहेत. मात्र फिनलँडच्या वृत्तपत्राने स्वतः यासाठी पुढाकार घेतला असून हेल्सिंगिन सनोमॅट (Helsingin Sanomat) या वृत्तपत्राने सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगण्यासाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

- Advertisement -

या जाहिरातीचे वैशिष्ट्य म्हणजे वाचक ती जाहिरात सामान्यपणे वाचू शकत नाही, तर ती जाहिरात वाचण्यासाठी वृत्तपत्रापासून किमान ६ फूट अंतर ठेवणे आवश्यक असणार आहे. ही जाहिरात जवळून वाचली तर ती वाचणे वाचकांना शक्य होणार नाही, सोशल डिस्टन्सिंगचे चांगल्या प्रकारे वर्णन करण्यासाठी वर्तमानपत्राने एक आभासी मार्ग स्वीकारला असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्यास जाहिरात वाचणे शक्य

फिनलँडच्या फिनलँड वर्तमानपत्र हेलसिंगिन सनोमॅटने (Helsingin Sanomat) एक अनोखी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जी बारकाईने वाचणे अशक्य आहे. डिजिटल अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी ‘द स्टेबल’ च्या म्हणण्यानुसार, फिनलँडमधील एका वर्तमानपत्राने पृष्ठावरील सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी ही जाहिरात प्रकाशित केली आहे. यामध्ये लोकांना एकमेकांपासून दूर राहण्यास सांगितले गेले असून केवळ एकमेकांपासून दूर राहिल्यास प्रत्येकजण सुरक्षित राहू , असे ही म्हटले आहे.


… म्हणून ‘या’ वृत्तपत्राने पहिल्या पानावर छापली कोरोनाने बळी घेतलेल्या रूग्णांची नावं!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -