घरदेश-विदेशदेशात पहिल्यांदाच रोबोने केली 'हार्टसर्जरी'

देशात पहिल्यांदाच रोबोने केली ‘हार्टसर्जरी’

Subscribe

संशोधनानुसार देशात वर्षभरात ह्रदयविकाराच्या झटक्याने १८ लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील सर्वाधिक मृत्यू हे ग्रामीण भागात होतात. अशावेळी या रोबोची मदत होईल

मेडिकल सायन्समध्ये देशाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अहमदाबादेत ३२ किमी अंतरावरुन एका महिलेवर ह्रदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. ही शस्त्रक्रिया रोबोने केली असून देशात पहिल्यांदाच टेलीरोबोटिक ऑपरेशन यशस्वी पार पडले आहे. जागतिक स्तरावर पहिल्यांदाच असा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरातून भारतीय डॉक्टरांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

वाचा- देशात पहिली यशस्वी कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

अशी पार पडली शस्त्रक्रिया ?

अहमदाबादेतील प्रसिद्ध डॉक्टर तेजस पटेल यांनी स्वामीनारायण मंदिर अक्षरधाम येथून अहमदाबाद येथील एपेक्स हार्ट इन्स्टिट्यूटमधील रुग्णावर टेलिरोबोटिक टेकनिकचा वापर करुन ही शस्त्रक्रिया केली. देशात पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वीदेखील झाला. या शसत्रक्रियेदरम्यान कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून ऑपरेशन थिएटरमध्ये अन्य सर्जन डॉक्टरदेखील उपस्थित होते. ही सर्जरी पूर्णत: इंटरनेटवर अवलंबून होती असे डॉ. तेजस पटेल यांनी सांगितले. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मेडिकल सायन्समध्ये खूप मोठा बदल होणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -
हे माहित आहे का? – जखमी सापावर अशी केली जाते शस्त्रक्रिया

ग्रामीण भागात या प्रणालीचा अधिक उपयोग

संशोधनानुसार देशात वर्षभरात ह्रदयविकाराच्या झटक्याने १८ लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील सर्वाधिक मृत्यू हे ग्रामीण भागात होतात. अशावेळी या रोबोची मदत होईल. त्यामुळे या रोबोचा उपयोग दुर्गम भागातील लोकांना अधिक होईल. ज्या ठिकाणी एक्सपर्ट डॉक्टर सर्जरीसाठी पोहोचू शकत नाही. त्याठिकाणी या  रोबोच्या माध्यमातून सर्जरी करणे शक्य होईल. विशेष म्हणजे एक कॅथलॅब आणि एका सर्जनच्या केवळ यांचीच गरज या शस्त्रक्रियेसाठी असेल.

 शस्त्रक्रिया महागणार? 

नुकतीच ही नवी प्रणाली जगभरात लॉन्च करण्यात आली. पण पहिली शस्त्रक्रिया ही भारतात पार पडली आहे. सध्या या नव्या प्रणालीमुळे ह्रदयशस्त्रक्रियेचा खर्च ४० ते ५० हजार रुपयांनी वाढू शकतो. पण एकदा ही प्रणाली जगभरात स्थिरावल्यानंतर  शस्त्रक्रियांचे दरही कमी होतील, असा विश्वास डॉ. तेजस पटेल यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -