घरदेश-विदेशगौतम गंभीर दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार

गौतम गंभीर दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार

Subscribe

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून भाजपने गौतम गंभीरला पूर्व दिल्लीमधून उमेदवारी दिली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गौतम गंभीर हा दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे. गौतम गंभीरची एकूण संपत्ती १४७ कोटी रुपये एवढी आहे. यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश आहे. तसेच गौतम गंभीरकडे ५ चारचाकी आणि एक दुचाकी गाडी आहे. २०१७-१८ साली गंभीरने प्राप्तिकर परताव्यामध्ये १२.४० कोटी रुपये एवढे वार्षिक उत्पन्न दाखवले होते. पूर्व दिल्लीमधून गौतम गंभीरचा सामना आपच्या आतिशी यांच्याशी आहे. पश्चिम दिल्लीचे काँग्रेसचे उमेदवार महाबली मिश्रा हे दिल्लीतील दुसरे श्रीमंत उमेदवार आहेत. महाबली मिश्रा यांच्याकडे जवळपास ४५ कोटींची संपत्ती आहे.

भाजपकडून दिल्ली ईशान्य मतदारसंघातून निवडणूक लढणार्‍या गायक हंस राज हंस यांनी प्राप्तिकर परताव्यामध्ये आपले २०१७-१८चे उत्पन्न ९.२८ लाख रुपये एवढे दाखवले आहे. हंस राज हंस यांच्यासमोर उभे असलेल्या काँग्रेस उमेदवार राजेश लिलोथिया यांचं २०१७-१८चे उत्पन्न २६.३४ लाख रुपये होते. बॉक्सर विजेंदर सिंग याला काँग्रेसने दक्षिण दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. विजेंदर सिंग याची एकूण मालमत्ता १२.१४ कोटी रुपये आहे. यातील ३.५७ कोटी रुपये जंगम आणि ५.०५ कोटी रुपये स्थावर मालमत्ता आहे.काँग्रेस नेत्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षीतही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. शिला दिक्षीत यांची एकूण संपत्ती ४.९२ कोटी रुपये एवढी आहे. २०१७-१८ साली शिला दिक्षीत यांचे उत्पन्न १५ लाख रुपये होते. शिला दिक्षीत यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे निझामुद्दीन भागामध्ये एक अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटची किंमत जवळपास १.८८ कोटी रुपये एवढी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -