घरमुंबई२३ मे रोजी दिसेल मतदारांचा भाजपवर सर्जिकल स्ट्राईक

२३ मे रोजी दिसेल मतदारांचा भाजपवर सर्जिकल स्ट्राईक

Subscribe

निवडणुकीवर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही मतदारसंघावर भाजपकडून सर्जिकल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आम्ही त्यात वाचलो असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. मुंबईतील टिळक भवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपकडून नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सभा घेण्यात आल्या होत्या. दुसर्‍या बाजूला वंचित बहुजन आघाडीकडूनही जोर लावण्यात आला होता. आम्हाला मतदारसंघात कसे बांधून ठेवता येईल, याचा पुरेपूर प्रयत्न झाला. मात्र सामान्य जनता भाजपला त्रस्त झाल्यामुळे मतदानावर त्याचा प्रभाव दिसला नसून भाजपच्या सर्जिकल स्ट्राईकपासून आम्ही वाचलो असल्याची प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.

राज्यात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये भाजपची पिछेहाट झाली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विदर्भातून दिलासादायक चित्र असल्याचे आमच्या माहितीतून समोर आले आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही मत तेच आहे. विदर्भात यावेळी डीएमके (दलित, मुस्लीम, कुणबी) फॅक्टर चालला असून काँग्रेसला त्याचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचा दोन चार मतदारसंघ सोडले तर इतर ठिकाणी प्रभाव जाणवलेला नाही, असे यावेळी चव्हाण म्हणाले.

- Advertisement -

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल विचारले असता, “दक्षिण अहमदनगरच्या जागेवरून जे झाले ते वाईट होते. सुजय विखे पाटील यांनी वर्षभर आधीच त्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असे सांगितले होते. मात्र आघाडीची चर्चा करत असताना राष्ट्रवादीने तो मतदारसंघ सोडला नाही, तो त्यांचा अधिकार होता. सुजयने हट्ट केला आणि तो भाजपमध्ये गेला. मात्र राधाकृष्ण विखे पाटलांनी मुलासोबत फरफटत जायला नको होते. हा निर्णय तसा अवघड आहे, पण त्यांनी पक्षाला योगदान दिलेले आहे, त्यामुळे त्यांनी संयमाने निर्णय घ्यायला हवा होता.” असेही चव्हाण म्हणाले. तर मनसेवर बोलताना काँग्रेस पक्षाकडून मनसेला आघाडीत घेण्यासंबंधी विरोध झाला होता. मात्र राज ठाकरेंनी ज्याप्रमाणे मोदींच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे, त्याचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

भाजपशिवाय शिवसेनेचे अस्तित्व नाही

यावेळी चव्हाण यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेने भाजपसोबत जाऊन शहाणपणा निर्णय घेतला आहे. कारण भाजप वगळले तर शिवसेनेचे लोकसभेला अस्तित्वच नाही. तसेच हल्ली ईडी आणि ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकता येत नाही, असेही चित्र दिसत असल्याचे चव्हाण म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -