घरदेश-विदेशआणि 'पॉर्न साईट'वर अपलोड झाला तिचा व्हिडिओ

आणि ‘पॉर्न साईट’वर अपलोड झाला तिचा व्हिडिओ

Subscribe

घाबरलेल्या महिलेने मेल करुन धमकी देणाऱ्या व्यक्तिला काहीच उत्तर दिले नाही. हा राग मनात ठेऊन त्याने तिच्या सगळ्या मित्रांना एक नवा व्हिडिओ फेक इमेल आयडीवरुन पाठवला.

चेन्नईतील एका महिला हॉस्टेलमध्ये ९ स्पाय कॅमेरे सापडल्याची घटना घडली होती. आता तर चक्क एका हॉटेलमध्ये महिलेचा आंघोळ करतानाच व्हिडिओ रेकॉर्ड करुन तो चक्क पॉर्न साईटवर अपलोड केला. हा प्रकार महिलेला कळल्यानंतर तिने हॉटेलवर १०० कोटींचा दावा केला आहे. हा सगळा प्रकार अमेरिकेतील न्यू यॉर्कमधील हॅम्पटोन इन (Hampton Inn) या हॉटेलमध्ये घडला आहे. विशेष म्हणजे ही घटना तीन वर्षांपूर्वीची असून हॉटेक मालकांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने तपास सुरु केला आहे.

 हे नक्की वाचा- सावधान! महिला हॉस्टेलमध्ये लावले होते ९ स्पाय कॅमेरे

नेमकं प्रकरण काय?

जुलै २०१५ मध्ये एक महिला हॅम्पटोन इन या हॉटेलमध्ये राहिली होती. ती तिच्या परीक्षांसाठी न्यू यॉर्कमध्ये आली होती आणि या हॉटेलमध्ये राहिली होती. त्यावेळी तिचा आंघोळ करतानाचा एक नग्न व्हिडिओ तयार करण्यात आला आणि तो अपलोड करण्यात आला. तिला ही गोष्ट माहित नव्हती. सप्टेंबर २०१८ रोजी तिला एक मेल आला ज्यामध्ये एका व्हिडिओची लिंक आणि ही महिला तूच आहेस ना? असे विचारले होते. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ती एक पॉर्नसाईट होती. त्यावर तिचा व्हिडिओ संपूर्ण नावासह अपलोड करण्यात आला होता. तिने आणखी काही पॉर्न साईट चाळल्यावर तिला तिचा तो व्हिडिओ सापडला आणि तिला धक्का बसला. ज्या व्यक्तिने तिला मेल केला. तो तिला सतत मेल करुन धमकी देऊ लागला.

- Advertisement -

मित्रांनाही पाठवला व्हिडिओ

घाबरलेल्या महिलेने मेल करुन धमकी देणाऱ्या व्यक्तिला काहीच उत्तर दिले नाही. हा राग मनात ठेऊन त्याने तिच्या सगळ्या मित्रांना एक नवा व्हिडिओ फेक इमेल आयडीवरुन पाठवला. शिवाय आणखी काही पॉर्न साईटवर व्हिडिओ अपलोड करत तिची बदनामी केली.

हॉटेलवर केला मानहानीचा दावा

हे प्रकरण जास्त वाढू लागल्यानंतर सदर महिलेने या संदर्भात तक्रार केली. शिवाय हॅम्पटोन इन या हॉटेलवर १००कोटींचा दावा करत हॉटेलच्या गलथान कारभारामुळे असा प्रकार घडला असा आरोप करत अन्य कोणत्याही महिलेवर अशी वेळ येऊ शकते.

- Advertisement -

हॉटेलने दिले स्पष्टीकरण

झालेला प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे हॉटेलकडून कबूल करण्यात आले आहे. पण ज्या खोलीमध्ये ही महिला राहिली होती. तिथे कोणतेही पुरावे सापडू शकत नाही. कारण हॉटेलमधील रुम्सची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यावेळी अशा स्पाय कॅमेरा वा तत्सम रेकॉर्डिंग करणारे कोणतेही कॅमेरे सापडले नाहीत. तरीदेखील आम्ही आम्ही याचा अधिक तपास करत आहो, असे स्पष्टीकरण हॉटेलने दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -