घरदेश-विदेशअमित शहा दहशतवाद्यांचा खात्मा करणार; पदभार स्विकारल्यानंतर १० अतिरेकी रडारवर

अमित शहा दहशतवाद्यांचा खात्मा करणार; पदभार स्विकारल्यानंतर १० अतिरेकी रडारवर

Subscribe

अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर पहिल्याच आठवड्यात गृहमंत्रालयाने टॉप दहा अतिरेक्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या रियाज नायकू याचे देखील नाव आहे.

गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर अमित शहा जोरदार कामाला लागले आहेत. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषा किंवा सीमारेषा भागातून होणारी घुसखोरी ही एक मोठी डोकेदुखी आहे. या मार्गातून घुसखोरी करुन दहशतवादी भारतात येतात आणि आत्मघातकी हल्ला घडवून आणतात. काश्मिरी नागरिकांना देखील भडकवण्याचे काम हे दहशतवादी करतात. त्यामुळे या दहशतवाद्यांना वेळीच ठेसले पाहिजे. या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अमित शहा यांनी पाऊले उचलली आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्याचा कट रचणाऱ्या आणि हल्ला घडवून आणणाऱ्या अतिरेक्यांची यादी गृहमंत्रालयाने जाहीर केली आहे. याशिवाय आतापर्यंत १०२ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला असून जम्मू काश्मीरच्या घाटामध्ये २८६ अतिरेकी सक्रिय असल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.

यादीत ‘या’ अतिरेक्यांचा आहे समावेश

सुरक्षा दलांसोबत विचार विनिमय करुन टॉप दहा दहशतवाद्यांचे नावे ठरविण्यात आले आहेत. गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या दहा दहशतवाद्यांच्या यादीत जैश-ए-मोहम्मद, लष्कर ए तैयबा, अल बदर आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांची नावे आहेत. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या रियाज नायकू, लष्कर ए तैयबाचा जिल्हा कमांडर वसीम अहमद अॅलियास ओसामा आणि हिजबुलचा अशरफ मौलवी यांच्या नावांचा समावेश आहे.

- Advertisement -

सध्या बारमुला जिल्ह्यात हिजबुल मुजाहिद्दिनचा जिल्हा कमांडर मेहराजुद्दीन सक्रिय आहे. याशिवाय डॉ. सैफुल्लाह अॅलियास सैफुल्ला मीर याचे नाव देखील आहे. डॉ. सैफ श्रीनगरमध्ये काश्मीर तरुणांना भडकवून देशविरोधी काम करण्यास प्रवृत्त करत आहे. याशिवाय, पुलवामा जिल्ह्यात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणल्यानंतरही तिथे दहशतवाद्यांची कारवाई सुरु आहे. या भागात लपून बसलेला हिजबूलचा कुख्यात दहशतवादी अरशल उल हक याचे देखील नाव या यादीत आहे. याशिवाय जैश ए मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर हफीज ओमार आणि जहिद शेख अॅलियास यांचेही नाव यादीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -