घरमहाराष्ट्र'जिथे सत्ता तिथे राधाकृष्ण विखे पाटील'

‘जिथे सत्ता तिथे राधाकृष्ण विखे पाटील’

Subscribe

राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंब जिथे सत्ता असते तिथे पोहोचते. विखे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आमदारपदाच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारले असता नवाब मलिक यांनी हा खळबळजनक आरोप केला.

१९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता आली त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडीलांना मंत्रीपद मिळाले होते. नंतर युपीएचे सरकार आले त्यावेळी पुन्हा विखे पाटील काँग्रेसमध्ये परतले आणि आता भाजपची सत्ता आल्यावर राधाकृष्ण विखे पाटील भाजपकडे वळले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा ज्यावेळी भाजपमध्ये गेला त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेल्यासारखे होते. पब्लीसिटीसाठी टप्प्याटप्प्याने ते निर्णय जाहीर करत आहेत. विरोधी पक्षनेता गेला हे सांगण्यासाठी आज त्यांनी राजीनामा दिला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

हे वाचा – राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला आमदारकीचा राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मानले जात होते. २०१४ साली काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास ठेवून विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यभार सोपविला होता. मात्र लोकसभा निवडणुकीआधी दक्षिण अहमदनगरच्या जागेवरून विखे आणि पवार यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. दक्षिण अहमदनगरची उमेदवारी मिळत नसल्यामुळे विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत तिकीट मिळवले. लोकसभेचा निकाल लागेपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता. मात्र आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार, हे निश्चित झाले आहे.

- Advertisement -

तसेच राष्ट्रवादीचे काही आमदार वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा खोटी असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -