घरदेश-विदेशआयएमए घोटाळ्याचा सूत्रधार मन्सूर खानला अटक

आयएमए घोटाळ्याचा सूत्रधार मन्सूर खानला अटक

Subscribe

आय मॉनिटरी ॲडव्हायजर (आयएमए) पॉन्झी घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार मन्सूर खान याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्‍लीच्या विमानतळावर ताब्‍यात घेतले आहे.

आय मॉनिटरी ॲडव्हायजर (आयएमए) पॉन्झी घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार मन्सूर खान याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, शुक्रवारी दिल्‍लीच्या विमानतळावर ताब्‍यात घेतले आहे. मन्सूर खान विरोधात ईडीसोबतच एसआयटीने देखील लुक आउट नोटीस जारी केली होती. आज त्‍याला ताब्‍यात घेतल्‍यानंतर ईडीच्या कार्यालयात त्‍याची चौकशी केली जात आहे.

- Advertisement -

हजारो गुंतवणूकदारांनी केलेली तक्रारी दाखल 

मन्सूर खान याला ताब्‍यात घेण्याआधी एसआयटीचे प्रमुख रविकांत गौडा यांनी सांगितले की, आमच्या एसआयटीच्या टीमला मोहम्मद मन्सूर खान हा दुबईत असल्‍याची माहिती मिळाली होती. यावर त्‍याला भारतात परतून स्‍वत:ला पोलिसांच्या स्‍वाधीन होण्यास सांगितले होते. त्‍यावरून तो आज दुबईतून दिल्‍लीला आला. एसआयटीचे अधिकारी त्‍याला ताब्‍यात घेण्यासाठी दिल्‍लीमध्ये उपस्‍थित आहेत. एसआयटीचे प्रमुख रविकांत गौडा यांच्या मते ८ जूनला मन्सूर देश सोडून पळून गेला होता. खानच्या विरोधात हजारो गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल केल्‍या होत्‍या. यात हजारो लोकांनी चांगले परतावे देण्याच्या नावाने फसवत आपले पैसे बुडवल्‍याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र खानने भारतातून पलायन करण्याआधी एक ऑडिओ संदेश प्रसारीत केला होता. त्‍यामध्ये त्‍याने आत्‍महत्‍येची धमकी दिली होती.

हेही वाचा –

स्वत:चा बोल्ड सीन लीक झाल्यावर भडकली राधिका आपटे

- Advertisement -

रो-रो सेवा अखेर मुहूर्त मिळाला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -