घरक्रीडासचिन तेंडुलकर 'हॉल ऑफ फेम'ने सन्मानित

सचिन तेंडुलकर ‘हॉल ऑफ फेम’ने सन्मानित

Subscribe

सचिन तेंडुलकरला लंडनमध्ये 'हॉल ऑफ फेम'ने सन्मानित करण्यात आले आहे.

क्रिकेट जगतात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयसीसीकडून ‘हॉल ऑफ फेम’च्या यादीत समाविष्ट करुन त्यांचा गौरव करण्यात येतो. आयसीसीने आता या यादीत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचेही नाव समाविष्ट केले आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी विशेष करुन सचिनच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. सचिनला आतापर्यंत अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. भारताने सचिनला भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ पुरस्काराने गौरविले आहे. आता आयसीसीने देखील सचिनच्या कारकिर्दीचा सन्मान केला आहे. आयसीसीने २००९ पासून क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना ‘हॉल ऑफ फेम’ने सन्मानित करायला सुरुवात केली. आतापर्यंत जवळपास ९० खेळाडूंना ‘हॉल ऑफ फेम’मार्फत सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा – वर्ल्डकप विजेते ट्रेवर बेलिस सनरायजर्सच्या प्रशिक्षकपदी

- Advertisement -

सचिनसोबत ‘या’ कलारांचाही समावेश ‘हॉल ऑफ फेम’मध्ये

सचिन तेंडुलकरसोबतच दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज अॅलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटपटू कॅथरिन यांचा देखील ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे. याअगोदरही काही भारतीय खेळाडूंचा यात समावेश करण्यात आला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनिंग बेदी, कपिल, देव, सुनील गावसकर, अनिल कुंबळे यांना ‘हॉल ऑफ फेम’मध्ये सामील करुन सन्मानित करण्यात आले आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन सचिन तेंडुलकरचे कौतुक केले आहे. मालिका, एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सचिन तेंडूलकरला ‘हॉल ऑफ फेम’ने सन्मानित करण्यात आल्याचे ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -