घरदेश-विदेशआज मध्य प्रदेशात राहुल गांधींचा मेगा रोड शो

आज मध्य प्रदेशात राहुल गांधींचा मेगा रोड शो

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा मध्य प्रदेश दौरा आजपासून सुरू होणार असून त्यासाठी काँग्रेस नेते जय्यत तयारी करत आहेत. राहुल गांधींचा मेगा रोड शो या ठिकाणी पार पडणार असून त्यानंतर जाहीर सभा होणार आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसली असून आजपासून त्यांच्या मध्य प्रदेस येथील दौऱ्याला सुरूवात होणार आहे. या राज्यात मेगा रोड शोचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर होणाऱ्या सभेत राहुल गांधी हजारो कार्तकर्त्यांना संबोधित करणार आहे. या रोड शोमध्ये ५१ जिल्ह्यातील काँग्रेस नेता आणि कार्यकर्ता सहभागी होणार आहेत. निवडणुकांच्या पाश्वभूमीवर होणाऱ्या या सभेमध्ये राहुल गांधी कार्यकर्त्यांना कोणाता कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

असा असेल राहुल गांधीचा कार्यक्रम

आज सकाळी साडेअकरा वाजता राहुल गांधी विशेष विमानाने भोपाळला दाकल होतील. विमानतळापासून कारने प्रवास करत ते लालघाटी चौकात जातील. लालघाटीहून दुपारी १२ वाजता त्यांचा रोड शो सुरू होईल जो लालघाटी ते व्हीआयपी गेस्ट गाऊस, इमामाी गेट, सदर मंजिल, कमला पार्क, पॉलिटेक्निक चौक, बाण गंगा, रोशनपुरा चौक, अपेक्स बँक, पीसीसी, ज्योती टॉकिज, चेतक ब्रिज, कस्तूरबा नगर ते अण्णा नगर असा प्रवास करून दसरा भेल मैदानावर दाखल होईल. रोड शो केल्यानंतर राहुल गांधींची भेल मैदानावर जाहीर सभा पार पडणार आहे.


सभेतून दिग्विजय सिंग यांचा कटआउट गायब

राहुल गांधीची रॅली सुरू होण्यापूर्वीच मध्य प्रदेशच्या राजधानी भोपालमध्ये वादाला सुरूवात झाली आहे. सभेच्या जागेवरून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा कटआउटच गायब झाला आहे. भेल येथील मैदानावर राहुल गांधी यांची सभा पार पडणार असून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोब कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया, विवेक तन्खा, सुरेश पचौरी, अजय सिंग, अरुण यादव आणि कांतिलाल भूरिया यांचे कटआउट लावण्यात आले आहेत. हे सर्व कटआउट २५ ते २६ फुट उंट आहेत. मात्र दिग्विजय यांचा कटआउट लावण्यात आलेला नाही. यावर अद्याप काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसून भाजपने मात्र संधी साधली आहे. भाजप प्रवक्ता रजनीश अग्रवाल यांनी म्हटले की, काँग्रेसमध्ये सगळ्यांनाच मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे. यामुळेच हा कटआउटचा गोंधळ झाला आहे. कमलनाथ आणि सिंधिया यांनी स्वतःला पुढे दाखवण्यासाठी दिग्विजय सिंग यांचा कटआउट लावला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -