कोविडशी लढ्यात भारताने गाठला मैलाचा दगड

कोविडशी लढ्यात भारताने मैलाचा दगड गाठला आहे. देशातील उपचार घेत असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या एक ते दीड महिन्यात प्रथमच ८ लाखांच्याही खाली आली आहे

India reported 61,408 new COVID-19 cases, 57,468 recoveries and 836 deaths in the last 24 hours

कोविडशी लढ्यात भारताने मैलाचा दगड गाठला आहे. देशातील उपचार घेत असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या एक ते दीड महिन्यात प्रथमच ८ लाखांच्याही खाली आली आहे. देशातील सक्रीय रुग्णसंख्या ७,९५,0८७ एवढी आहे. ही संख्या रुग्णसंख्येच्या १०.७० टक्के आहे. याआधी १ सप्टेंबरला सक्रीय रुग्णसंख्या ८ लाखाहून कमी (७,८५,९९६) नोंदवली गेली होती. दररोज मोठ्या संख्येने कोविड रुग्ण रोगमुक्त होत आहेत. यामुळे भारताचा सक्रीय रुग्णसंख्येच्या दरात सातत्याने घट होत आहे.

भारतात बरे होणार्‍याची संख्या मोठी आहे. या संख्येने ६५ लाख २४ हजार ५९५ टप्पा ओलांडला आहे. उपचार घेत असलेली सक्रीय रुग्णसंख्या आणि बरे झालेले रुग्ण यांच्या संख्येतील फरक सातत्याने वाढत आहे तो ५७,२९,५०८ एवढा राहिला. २४ तासात ७० हजार ८१६ पेशंट रुग्ण बरे झाले तर नवीन रुग्णांची संख्या ६२ हजार २१२ एवढी नोंदवली गेली. राष्ट्रीय पातळीवरील रिकव्हरी दर ८७.७८ टक्क्यांवर पोहोचला.

केंद्र सरकार आणि केंद्र शासित प्रदेश आणि राज्य सरकार यांच्या समन्वित प्रयत्नातून देशभरात आरोग्य सुविधा बळकट करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने वैद्यकीय उपचार नियमावलीत प्रमाणित मार्गदर्शक सूचनांचा समावेश तसेच वैद्यकीय, निम-वैद्यकीय आणि आरोग्यसेवक यांची समर्पित सेवाभावी सेवा यामुळे बरे होणार्‍या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ दिसत आहे. तसेच मृत्यूदरही लक्षणीयरित्या कमी झाला आहे. भारत हा जागतिक पातळीवर सर्वात जास्त रोगमुक्तांची संख्या तसेच सर्वात कमी मृत्यूदर नोंदवणारा देश आहे. मृत्यूदर १.५२ टक्के राहिला. महाराष्ट्रात एका दिवसात १३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून मुक्त झाले तर कर्नाटकात आठ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून मुक्त झाले.

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना या महामारीशी सामना करण्यासाठी केंद्राचे सहकार्य मिळत आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने वरिष्ठ पातळीवरील केंद्रीय गट केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल येथे पाठवल्या आहेत. या राज्यांमध्ये काही दिवसांत रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. हे गट राज्यांना अलगीकरण सुविधा, संसर्ग माग, निदान चाचण्या, संसर्ग प्रतिबंध, काळजी घेणे तसेच बाधितांवर औषधोपचार यासाठी मदत पुरवतील. वेळेवर निदान आणि त्याचा मागोवा यासंदर्भातही हे गट राज्यांना मदतीचा हात देतील.