घरलाईफस्टाईलYogasana : 'या' आसनांनी भीती आणि काळजी दूर करा!

Yogasana : ‘या’ आसनांनी भीती आणि काळजी दूर करा!

Subscribe

एखादी कोणतीही गोष्ट होणे किंवा होण्याची शक्यता घेऊन स्वतःला त्रास करून घेणे, त्यासाठीची भीती बाळगणे. एक घाबरलेला व्यक्ती तणावात राहून सहजच काळजीत पडू शकतो. श्वासोच्छ्वास वेगाने होणे, घाम फुटणे, कापरं भरणे, स्नायूंमध्ये ताण येणे, अंधुक दृष्टी होणे, श्वास घ्यायला त्रास होण्यासारखं जाणवणे हे महत्वाचे लक्षणे आहेत. योगाने किंवा व्यायामाने काळजी किंवा भीतीवर उपचार सहज शक्य आहे. जर का आपण काळजी, भीतीने किंवा नैराश्याने ग्रस्त असाल तर या योग क्रियेचा किंवा या काही व्यायामाचा सराव करावा.

हे योगा प्रकार करतील भीती दूर –

  • अनुलोम -विलोम – हा व्यायाम केल्यानं रक्त विसरणं चांगलं होतं, संसर्गाला दूर करण्यास मदत करते.
अनुलोम -विलोम
  • पश्चिमोत्तानासन – काळजी वाळजी राहील दूर, मन मेंदूला ठेवणार हा कूल. हा व्यायाम केल्यानं मन आणि मेंदू शांत राहतं आणि काळजी दूर होते.
  • मत्स्यासन – हा व्यायाम केल्यानं शरीर आणि मनामध्ये व्यवस्थितरीत्या संतुलन राहतं. काळजी नाहीशी होते.
  • शशांकासन – हा व्यायाम केल्यानं मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहतं, दररोजच्या सरावाने मानसिक आजार देखील दूर होतात.
शशांकासन
  • चंद्रभेदी प्राणायाम – हा व्यायाम केल्यानं झोप न येण्याची समस्या पासून सुटका होते. तसंच मानसिक शांतीसाठी दररोज दररोज चंद्रभेदी प्राणायाम करावा.
  • वृक्षासन – हा व्यायाम केल्यानं शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतील, कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य असणारा व्यायाम.
  • नाडी शोधन प्राणायाम – हा व्यायाम केल्यानं मन शांत आणि एकाग्र होतं. दररोज याचा सराव केल्यानं काळजी दूर होते.
  • भुजंगासन – हा व्यायाम केल्यानं मणक्याचे हाड बळकट होऊन नैराश्य दूर होतं, या भुजंगासनाने भीती किंवा धास्ती दूर होते.
भुजंगासन

हेही वाचा –

नवरात्र उपवास स्पेशल रेसिपी: राजगिऱ्याचे थालीपीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -