घरदेश-विदेशबलिदानाचा बदला घेणार; भारताची पाकिस्तानला तंबी

बलिदानाचा बदला घेणार; भारताची पाकिस्तानला तंबी

Subscribe

पाक सैन्याच्या कुपवाडामधील भ्याड हल्ल्यानंतर आता भारतीय लष्करानेही पाकिस्तानला अद्दल घडवण्याचा निर्धार केला आहे.

मागील शुक्रवारी काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याच्या स्नायपर्स हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराचे २ जवान शहीद झाले होते. कुपवाडा येथे असलेल्या सीमा रेषेजवळ पाकिस्तानी स्नायपर्स आणि भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये ही चकमच झाली होती. दरम्यान, एका लष्करी अधिकाऱ्याने याच घटनेला अनुसरुन पाकिस्तानला चांगलीच तंबी दिली आहे.  ‘पाकिस्तानी सैन्याच्या स्नायपर्स कारवाईला जशास तसे प्रत्युत्तर देऊ आणि या कारवाईचं वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू’, अशा प्रखर शब्दांत त्यांनी पाकिस्तानी सैन्याला ठणकावले आहे. पाक सैन्याच्या कुपवाडामधील त्या नापाक हरकतीनंतर आता भारतीय लष्करानेही पाकिस्तानला अद्दल घडवण्याचा निर्धार केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. संबंधित लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, मोर्टार, हलक्या तोफा, रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राच्या वापरापेक्षा स्नायपर्स हल्ले जास्त परिमाणकारक ठरतात. अशाप्रकारचे स्नायपर्स हल्ले शिरच्छेदांच्या घटनांसमान असतात. त्यामुळे प्रतिस्पर्धी सैन्याच्या मनोबलाचं खच्चीकरण करणं सहज शक्य होतं, अशी माहिती या अधिकाऱ्याने सांगितले.


वाचा : हनुमानजी भाजपच्या लंकेचं दहन करतील…

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये नेहमीच चकमकी होत असतात. या चकमकींदरम्यान कधी भारतीय लष्कराचे जवान दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात यशस्वी ठरतात, तर कधी दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यामध्ये जवानांना आपले प्राण गमवावे लागतात. उपलब्ध माहितीनुसार, दिवसेंदिवस सीमेवरी शत्रूच्या कारवाया वाढत असून, भारतीय पायदळाला आजही १९६० च्या दशकात डिझाईन करण्यात आलेल्या रशियन बनावटीच्या ७.६२ एमएम ड्रॅग्युनोव्ह सेमी ऑटोमॅटिक स्नायपर रायफल्स वापराव्या लागत आहेत. या रायफल्सची रेंज केवळ ८०० मीटर आहे. टाईम्सच्या वृत्तामध्ये म्हटल्यानुसार, भारतीय लष्कराकडून गेल्या काही वर्षांपासून १२०० मीटर रेंज असलेल्या  ५,७१९ ८.६ एमएम रायफलची मागणी केली जात आहे. पाकिस्तानी स्नायपर्सकडे अमेरिकन बनावटीच्या चांगल्या दर्जाच्या स्नायपर रायफल्स आहेत. भारताच्या तुलनेत पाकिस्तानी लष्कराने स्नायपर्सच्.ा  प्रशिक्षण आणि उपकरणांमध्ये अद्ययावत सुधारणा केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -