घरदेश-विदेशइंडोनेशिया विमान अपघात; बिघडलेल्या एअरस्पीड इंडीकेटरसह झाले उड्डाण

इंडोनेशिया विमान अपघात; बिघडलेल्या एअरस्पीड इंडीकेटरसह झाले उड्डाण

Subscribe

अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या डेटा रेकॉर्डरमधून अशी माहिती मिळाली आहे की, लायन एयरच्या अपघातग्रस्त विमानातील एयरस्पीड इंडिकेटर गेल्या चार उड्डाना दरम्यानच बिघडलेले होते.

इंडोनेशियामध्ये १८९ प्रवाशांनी भरलेले विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या १३ व्या मिनिटात समुद्रात कोसळले होते. इंडोनेशिया सरकारकडून समुद्रामध्ये या विमानाचा शोध सुरु आहे. आतापर्यंत अपघातग्रस्त विमानाच्या लँडिंग गियरचा तुकडा आणि ब्लॅक बॉक्स सापडले होते. विमानाच्या इतर भागांचा देखील शोध सुरु आहे. दरम्याम अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या डेटा रेकॉर्डरमधून अशी माहिती मिळाली आहे की, लायन एयरच्या अपघातग्रस्त विमानातील एयरस्पीड इंडिकेटर गेल्या चार उड्डाना दरम्यानच बिघडलेले होते. ही माहिती तापस यंत्रणांनी सोमवारी दिली आहे. दरम्यान, या विमान अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांनी लायन एयर लाइन कंपनीच्या को फाऊंडरची भेट घेतली.

आधीपासून एअरस्पीडमध्ये होती समस्या

नॅशनल ट्रासपोर्टेशन सेफ्टी कमिटीचे चेअरमन सोएजांतो जाहजोनो यांनी सांगितले की, लायन एअरच्या अपघातग्रस्त विमानातील एअरस्पीड इंडिकेटरमध्ये समस्या गेल्या चार उड्डाणा दरम्यान आली होती. या अपघातामध्ये विमानामध्ये असलेले १८९ प्रवाशांचा मृत्यू झाला. जेव्हा अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला तेव्हा माहिती पडले की, त्यामध्ये एअरस्पीडची समस्या होती. ब्लॅक बॉक्सच्या डेटामधून हे देखील माहिती पडले की, बाली – जकार्तावरुन उड्डान घेतलेल्या दोन विमानामध्ये अशा प्रकारची समस्या आली होती.

- Advertisement -

आठ विमानांच्या एअरस्पीडची तपासणी

इंडोनेशियन तपास यंत्रणांनी विमानामध्ये मॅन्युफॅक्चर्स, बोइंग आणि यूएसस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड बोइंग ७३७ मॅक्समध्ये आठ विमानांच्या एअरस्पीडसंबंधी समस्याचा तपास करणार आहे. जर यासंबंधित काही महत्त्वाची माहिती समोर आली तर आम्ही ऑपरेटर्स आणि मॅन्युफॅक्चर्सला याविषयी सांगणार. लायन एअरने असे सांगितले की, बालीवरुन जकार्ता विमानामध्ये आलेल्या समस्येनंतर या विमानाची ताबडतोब दुरुस्ती केली गेली. एका आणखी तपास अधिकाऱ्याचे असे म्हणणे आहे की, विमानाच्या मेंटिनेंसची समिक्षा करणे गरजेचे आहे.

अशी घडली होती घटना

जकार्ता येथून लायन एअरच्या ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ या प्रवासी विमानाने सकाळी ६.२० वाजता उड्डाण केले. रन वे मोकळा नसल्यामुळे विमान ११ मिनिटं उशीराने टेक ऑफ करण्यात आले. उड्डाणानंतर केवळ १३ मिनिटातच या विमानाचा एयर ट्राफिक कंट्रोलरशी संपर्क तुटला. त्यानंतर जवळपास दोन नॉटिकल (३.७ किलोमीटर) कारावांग समुद्रामध्ये विमान क्रॅश झाले. अपघातग्रस्त विमानामध्ये १८१ प्रवासी ज्यामध्ये एका लहान मुलाचा आणि दोन बाळांचा समावेश होता. तसंच ८ क्रू मेंबर्स असे एकूण १८९ प्रवासी विमानात होते. अपघातानंतर या विमानातील सर्वांना जलसमाधी मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -