घरदेश-विदेशकोलकाता आणि राजस्थान दरम्यान रंगणार आज सामना

कोलकाता आणि राजस्थान दरम्यान रंगणार आज सामना

Subscribe

कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात दुसरा क्वॉलिफायर सामना रंगणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ पहिल्या क्वॉलिफायरमध्ये अपयशी ठरलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघासोबत एलिमिनेटर सामन्यात खेळणार आहे. एलिमिनेटर सामन्यात जिंकणारा संघ अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जसोबत खेळणार आहे.

राजस्थानला प्लेऑफसाठी नशिबाचीच साथ
राजस्थानचा प्लेऑफमध्ये समावेश झाला असला, तरी मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेवन पंजाब यांच्या सुमार कामगिरीमुळे ते साध्य झाले आहे. राजस्थान रॉयलचे खेडाळू जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांनी दमदार कामगिरी करुन रॉयल चॅलेंजेर्स बँगलोरला हरविले. त्यामुळे राजस्थान रॉयल प्लेऑफच्या जवळ येताना दिसत होती. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली डेअरडेविल्स आणि किंग्ज इलेवन पंजाबने मुंबईला हरविले. याचा फायदा राजस्थान रॉयल्सला होऊन प्लेऑफमध्ये राजस्थानचा समावेश झाला.

- Advertisement -

कोलकाताचे हे तगडे प्लेअर
कोलकाताने सनरायजर्स हैदराबादला हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. कोलकाताकडे दिनेश कार्तिक, सुनील नरेन यांसारखे आक्रमक फलंदाज व कुलदीप यादव, पियूष चावला, क्रिस लिन सारखे गोलंदाज आहेत. सुनील नरेन या खेडाळूने तर आयपीएलच्या एका सिझनमध्ये ३०० पेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. त्याचबरोबर १५ विकेट्स ही त्याने घेतल्या आहेत.

राजस्थानला रस्सल तर कोलकाताला हेनरिक क्लासेन
दोन आठवड्यांआधी राजस्थान आणि कोलकाता दोन्ही संघ आमने-सामने आले होते. त्यावेळी कोलकाताने राजस्थानला ६ विकेटने हरविले होते. कोलकाताचा रस्सल हा राजस्थानसाठी धोकादायक ठरु शकतो. त्यामुळे त्याला अडविणे राजस्थानला महत्वाचे आहे. दुसरीकडे बघितले गेले तर राजस्थानचा हेनरिक क्लासेनही कोलकाताची डोकेदुखी ठरु शकतो.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -