घरदेश-विदेशइस्रोच्या 'पीएसएलव्ही सी-४३' ची यशस्वी चाचणी

इस्रोच्या ‘पीएसएलव्ही सी-४३’ ची यशस्वी चाचणी

Subscribe

इस्रोने आज पीएसएलव्ही सी-४३ या उपग्रहाचे यशस्वी रित्या प्रक्षेपण केले आहे. हा उपग्रह देशातील हवामान, माती आणि पाणी संबधीत माहिती मिळणार आहे.

इस्रो आपल्या उपग्रहांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरांवर चर्चेचा विषय बनला आहे. इस्रोने श्रीहरिकोटा येथून आज ‘पीएसएलव्ही सी ४३’ आज सकाळी अंतराळात यशस्वी रित्या पाठवले आहे. या उपग्रहाचा वापर भारताचे हवामान आणि पाणी यावर लक्ष ठेवण्यासाठी केला जाणार आहे. या यानात भारताने इतर देशांचेही उपग्रह अंतराळात पाठवले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे प्रक्षेपण करण्यात आले. सकाळी ९ वाजून ५८ मिनीटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहाचे वजन ३८० किलो आहे.

- Advertisement -

इतर देशांचेही उपग्रह सहभागी

अंतराळात पाठवण्यात आलेल्या उपग्रहांपैकी पृथ्वीचे निरिक्षण करणारा हायसिस हा भारताचा उपग्रह पाठवण्यात आला. या उपग्रहाबरोबरच आठ देशातील ३० उपग्रह पाठवण्यात आले. यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, मलेशिया, नेदरलँड आणि स्पेन या देशांच्या उपग्रहांचाही समावेश आहे. मागील काही वर्षात इस्रोने केलेल्या या कामगिरीचे जगभरात कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -