घरदेश-विदेशसीमाभागात पाककडून गोळीबार सुरुच, एक जवान शहीद

सीमाभागात पाककडून गोळीबार सुरुच, एक जवान शहीद

Subscribe

जम्मु काश्मीर येथील सीमाभागावर अजूनही गोळीबार सुरुच आहे. पाककडून केलेल्या गोळीबारामध्ये एक जवान शहिद झाला आहे.

जम्मू-काश्मीर सीमारेषेवर पाकिस्तानकडून अजूनही गोळीबार सुरु आहे. आज झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. हरी वाकर असं या शहीद जवानाच नाव आहे. राजस्थानमधील वाकर येथील ते रहीवासी होते. मागील काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमारेषेभागात तणावाची स्थिती आहे. आज पुंछ सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात हा जवान शहिद झाला आहे. स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहिती नुसार शनिवारी सायंकाळी पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात वाकर जखमी होते. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानी सैन्याने मागील काही दिवसांपासून सीमाभागात गोळीबार केला आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तान सीमा भागावर गोळीबार करतो आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यांनी शाहपूर आणि केरनी परिसराला लक्ष्य केलं, अशी माहिती संरक्षण मत्रालयाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -