घरदेश-विदेशजेट एअरवेजला मिळाली पीएनबीची साथ

जेट एअरवेजला मिळाली पीएनबीची साथ

Subscribe

मागील काही महिन्यांपासून कर्जात असलेली जेट एअरवेज कंपनीला पंजाब नॅशनल बँकेने मदतीचा हात दिला आहे. या मदतीनंतर जेट एअरवेजला अच्छे दिवस येणार आहेत.

भारतीय मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक जेट एअरवेज कंपनी मागील काही महिन्यांपासून कर्जात आहे. आर्थिक तोट्यामध्ये असल्यामुळे या कंपनीच्या विमानसेवेवर फरक पडला होता. मागील अनेक महिन्यांपासून तोट्यात सुरु असलेली जेट एअरवेजला आता पंजाब नॅशनल बँकेकडून मदतीचा हाथ मिळाला आहे. जेट एअरवेजला पीएनबीने २,०५० कोटींचे कर्ज दिले आहे. जेट एअरवेजला आर्थिक संकटापासून वर काढण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. जेट एअरवेजने पीएनबीकडून १ हजार १०० कोटी रुपयांचे परकीय चलन टर्म लोन आणि ९५० कोटी रुपयांची क्रेडिट सुविधा दिली आहे. मागील अनेक महिन्यांपासून जेट एअरवेजच्या व्यवहारांवर सरकारचे लक्ष होते. कंपनीने या लोनचा वापर करून आपली पहिली थकबाकी भरून काढावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वधारला शेअर्सचा भाव

मागील अनेक महिन्यांपासून जेट एअरवेज कंपनी आर्थिक संकाटतून जात होती. पुरेसा पैसा नसल्यामुळे जेट एअरवेजला आपल्या कर्मचाऱ्यांचा पगारही देता येत नव्हता. त्यामुळे अनेकदा कर्मचारी कामावर येत नव्हते. जेट एअरवेजला आपल्या काही विमानांच्या फेऱ्याही रद्द कराव्या लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांना अनेकदा गैरसोय देखील झाली. मात्र आता आर्थिक मदत मिळाल्यामुळे जेट एअरवेज येत्या काळात चांगले काम करेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. कर्ज मिळाल्यानंतर जेट एअरवेजच्या शेअर्स भावात वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -