JNU Violence : हल्ला करणाऱ्यांमधील ‘ती’ तरुणी अभाविपची सदस्य

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसून हल्ला करणाऱ्या टोळक्यातील तोंड बांधलेल्या मुलीची ओळख पटवण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं आहे.

Delhi
jnu violence police identify masked woman in video
हल्ला करणाऱ्यांमधील 'ती' तरुणी अभाविपची सदस्य

जेएनयू प्रशासनाने घेतलेल्या शुल्क वाढीविरोधात विद्यार्थ्यांनी ५ जानेवारी रोजी आंदोलन केले होते. या आंदोलना दरम्यान, तोंड बांधून आलेल्या टोळक्यांने अचानक पेरियार आणि साबरमती वसतिगृहात घुसून धुडगुस घातला. या हल्ला करणाऱ्या टोळक्यातील तोंड बांधलेल्या मुलीची ओळख पटवण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. तसेच ही तरुणी अभाविपची (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) सदस्य असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

ही तरुणी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी

दरम्यान, पेरियार वसतिगृहात आणि सर्व्हर रूममध्ये तोडफोड करणाऱ्या संशयितांची नावे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केली. त्यानंतर साबरमती आणि पेरियार वसतिगृहात घुसून हल्ला करणाऱ्या टोळक्यातील एका मुलीची ओळख देखील पटली आहे. एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये साबरमती वसतिगृहात एक मुलगी हातात काठ्या असलेल्या दोन सहकाऱ्यांसह धमक्या देत असताना दिसत आहे. तसेच या तरुणीने चौकडी शर्ट घातले आहे. त्याचप्रमाणे या मुलीने स्वतःचा चेहरा निळ्या रंगाच्या स्कार्फने बांधलेला दिसत असून ही मुलगी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी आहे. मात्र, तिचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. तसेच या मुलीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन बंद असून पोलिसांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले आहे.

जेएनयू प्रशासनाने घेतलेल्या शुल्क वाढीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. हातात लोखंडी सळ्या आणि काठ्या घेऊन या टोळ्यांनी आंदोलकांवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात ३४ जण जखमी झाले होते. या घटनेचा तपास सुरू असून, यासाठी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.


हेही वाचा – संजय राऊत यांच्या तोंडाला लगाम घाला


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here