कंगना आणि माझी लढाई सुशांतसाठीच, अध्ययन सुमनचा यू टर्न!

कंगना- अध्ययन
Advertisement

कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील वाद दिवसेंदिवस आणखीनच गडद होत आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अलीकडेच सांगितले होते की, कंगना अमली पदार्थांचे सेवन करायची या चौकशी केली जाईल. यावेळी बोलताना त्यांनी कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनच्या एका मुलाखतीचा आधार घेतला होता. मात्र गृहमंत्र्यांच्या स्टेटमेंटनंतर अध्ययन मात्र चांगलाच अस्वस्थ झाला. आता अध्ययन यूटर्न घेतला आहे. अध्ययने एक व्हिडिओ शेअर करत त्याचा आणि कंगनाचा आता काही संबंध नसल्याचं त्याने या व्हिडिओत म्हटलं आहे.

आमची लढाई सुशांतसाठी

अध्ययनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये  त्याने हात जोडून विनवणी केली की, त्याला या प्रकरणात खेचले जाऊ नये. अध्ययन म्हणतो, मला जे म्हणायचं होतं ते मी २०१६ मध्येच सांगितलं आहे. त्याचा परिणाम असा झाला की टेलिव्हिजनवर माझी आणि माझ्या कुटुंबाची खिल्ली उडवली गेली. आता मी त्या गोष्टी विसरलो आहे आणि पुढे गेलो आहे. मी तुमच्या पुढे हात जोडतो कृपया मला भूतकाळात ढकलू नका. मी खूप कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. कंगनाबरोबर आता माझं कोणतच नातं नाहीये. पण आम्ही सुशांतला न्याय मिळावा या एकाच कारणासाठी आम्ही दोघेही लढत आहोत.

२०१६ साली अध्ययनने कंगनावर केले होते आरोप

२०१६मध्ये अध्ययनने कंगनावर अनेकांवर आरोप केले होते. डीएनए वृत्तपत्राला २०१६ मध्ये एक मुलाखत दिली होती. त्यात त्याने सांगितले की रिलेशनशिप दरम्यान कंगनाने त्याचा शारीरिक आणि भावनिक छळ केला. कंगना त्यांना मारहाण करायची, शिवीगाळ करायची, एवढेच नाही तर अध्ययनवर बूट देखील कंगनाने फेकून मारले. मार्च २००८  मध्ये कंगनाने तिची वाढदिवसाची पार्टी हॉटेल ‘द लीला’ मध्ये केली होती. या पार्टीत त्यांनी एकत्र काम करणार्‍या सर्व मित्रांना आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित केले. त्या पार्टीत कंगनाने मला सांगितले की आज रात्री कोकेन घेऊया. त्यापूर्वी मी तीच्याबरोबर काही वेळा हॅश प्यालो, मला ते आवडले नाही, म्हणून मी कोकेन घेण्यास नकार दिला. मला आठवते की त्याच रात्री माझे तिच्याबरोबर जोरदार भांडण झाले.

त्यावेळी मी ड्रग्सचं व्यसन करत होते…

अभिनेत्री कंगना रणौत सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रचंड चर्चेत आहे. “बॉलिवूडमधील ९० टक्के कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात. त्यामुळे शूटिंगला परवानगी देण्यापूर्वी त्यांची ड्रग्स टेस्ट करा, असा खळबळजन आरोप कंगनाने केला होता. पण आता एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कंगना ड्रग्स व्यसनाचा अनुभव सांगताना दिसत आहे. “मी घरातून पळाले होते. दिड-दोन वर्षात मी एक फिल्म स्टार झाले. त्याच वेळी मला ड्रग्सचं व्यसन लागलं होतं. माझी अवस्था खूप विचित्र झाली होती. मी वाईट लोकांच्या संगतीत होते.” असा अनुभव कंगनाने या व्हिडीओमध्ये सांगितला आहे. “मी आयुष्यात कधीही ड्रग्सचं सेवन केलं नाही, मी ड्रग्ज टेस्ट द्यायलाही तयार आहे” असं कंगनाने इतर कलाकारांवर आरोप करताना म्हटलं होतं.

या सगळ्या प्रकणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाची ड्रग्ज टेस्ट केली जाणार असल्याचं म्हटलं. अध्ययन सुमनच्या व्हिडिओचा आधार घेत त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं. मात्र आता अध्ययननेच युटर्न घेतल्यावर मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास कोणत्या आधारावार करणार? कंगनाची ड्रग्ज टेस्ट होणार का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.