हाच तर मोदींचा नवा भारत – कपिल सिब्बल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी अमोल पालेकर प्रकरणावरुन सत्ताधारी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला आहे.

Mumbai
Kapil sibbal slams bjp over amol palekar incident
फोटो सौजन्य - ANI

अमोल पालेकर यांचं भाषण रोखल्याचं प्रकरण सध्या जोरजार चर्चेत आहे. एक पत्रकार परिषद घेत ‘माझं भाषण मध्येच का रोखलं?’ असा सवाल स्वत: पालेकर यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही या मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजप आणि मोदींवर निशाणा साधला आहे. ‘सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर राजद्रोहाचा खटला दाखल केला जातो, कुणाला सरकारविरुद्ध बोलू दिले जात नाही, सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या अमोल पालेकरांचे भाषण मध्येच रोखले जाते… मोदींचा नवा भारत हाच आहे ना.. देश बदलतोय, मोदी याच अच्छे दिनविषयी बोलत होते’, अशा शब्दांत सिब्बल यांनी मोदींवर टीका केली आहे.

‘सरकारे येतात आणि जातात पण सत्तेत असणाऱ्या प्रत्येकाची संविधानिकपदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बारीक नजर असते. पंतप्रधानांशी प्रामाणिक राहिल अशा आणि ज्याच्यामध्ये उत्साह आहे अशाच अधिकाऱ्याच्या ते शोधात असतात. मात्र, हे पद त्यांना संविधानाने दिलेले आहे, त्यामुळे संविधान सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, त्याची प्रतारणा होता कामा नये… हे या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं’, असा सल्ला सिब्बल यांनी यावेळी दिला. ते ANI वृत्तसंस्थेशी बोलत होते.

यावेळी राफेल डीलविषीय बोलताना सिब्बल म्हणाले, ‘राफेल डील ही तत्कालीन कॅग राजीव मेहरिशी हे अर्थ सचिव असताना झाली होती. तेव्हापासूनच या डीलमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत.’ मात्र, या प्रकरणात कॅग हे स्वतःचीच चौकशी कशी करतील? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘कॅग पहिल्यांदा स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतील नंतर सरकारचे. त्यामुळे हा स्वारस्याचा संघर्ष आहे’, असंही सिब्बल यावेळी म्हणाले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here