घरदेश-विदेशकर्नाटकात भाजपची कसोटी; आज निकाल

कर्नाटकात भाजपची कसोटी; आज निकाल

Subscribe

कर्नाटकमध्ये ५ डिसेंर रोजी १५ मतदारसंघांमध्ये मतदान झाले होते. त्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून ११ मतदारसंघांमध्ये मतमोजनीला सुरुवात झाली आहे. आज दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत भाजपला कमीत कमी सहा जागांवर यश मिळणे अपेक्षित आहे, तरच कर्नाटकातील सध्याचे बी. एस. येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार टिकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहेत. या घडामोडी घडवण्यात भाजप केंद्रस्थानी आहे. कर्नाटकात सत्ता मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप केला गेला. मात्र, इतक्या साऱ्या घडामोडींनंतरही भाजपच्या हाती सत्ता येते का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वी दोन महिन्यांअगोदर कर्नाटक राज्यात मोठा राजकीय भूकंप आला होता. कर्नाटकमध्ये भाजप पक्षाने सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांना फोडले होते. या सर्व आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर बरेच राजकीय नाट्य बघायला मिळाले. दरम्यान, भाजपने सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएस सरकारला विधानसभेत विश्वासाचा ठराव सिद्ध करण्याचे आवाहन केले. विश्वासाच्या ठरावाच्या वेळी बंडखोर १७ आमदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे कुमारस्वामी सरकार कोसळले. त्यानंतर कर्नाटकात भाजप सत्तेत आली. मात्र, बंड पुकारलेल्या त्या १७ आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले. त्यामुळे कर्नाटकात १५ मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे.

- Advertisement -

कर्नाटकात २०१८ मध्ये मतदान झाले होते. त्यावेळी भाजपला सर्वाधिक म्हणजे १०५ जगांवर यश मिळाले होते. यामध्ये भाजपला एका अपक्षाने पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपकडे सध्याच्या घडीला १०६ जागा आहेत. बहुमत मिळण्यासाठी ११२ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपला आणखी सहा किंवा त्यापेक्षा जास्त जागांची अपेक्षा आहे


हेही वाचा – महाराष्ट्र पाठोपाठ आता कर्नाटकातही भाजपची अग्निपरीक्षा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -