घरताज्या घडामोडीआसाम: पुरामुळे काझीरंगा नॅशनल पार्क उद्धवस्त, ४७ प्राण्यांचा मृत्यू

आसाम: पुरामुळे काझीरंगा नॅशनल पार्क उद्धवस्त, ४७ प्राण्यांचा मृत्यू

Subscribe

आसाममध्ये झालेल्या पुरामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान उद्धवस्त झाले आहे. पार्कचा ९० टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. तसेच ४७ जनावारांचा मृत्यू झाला आहे. डझनभर जनावर बेपत्ता झाली आहेत. याशिवाय पार्कातून पळून गेलेले वाघ सभोवताच्या गावात दिसले आहेत. या पुरामुळे काझीरंग राष्ट्रीय उद्यान आणि पोबितोरा वन्यजीव अभयारण्याची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. एक शिंग असलेला गेंडा, हरण आणि हत्ती उंच भागात पळून गेले आहेत. तर काही प्राणी उंच उंच भागात जाऊन लपले आहेत.

बहुतेक प्राणी कार्बी आंगलोंग हिल्सच्या दिशेने पळून गेले आहेत. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने पार्कच्या जवळ असलेल्या हायवे-३७वर गाड्यांचे स्पीड कमी ठेवण्याचा निर्देश जारी केला आहे. त्याचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. कारण या हायवे पार करून प्राणी उंच भागावर जात आहेत. काझीरंग राष्ट्रीय उद्यानाच्या म्हणण्यानुसार संपूर्ण नॅशनल पार्क ९० टक्के पाण्याखाली गेले आहे. उद्यानमध्ये तयार केलेल्या २२३ शिकार विरोधी कॅम्पस पैकी १६६ कॅम्पसमध्ये पाणी गेले आहे. त्यामुळे प्राण्यासह उद्यानातील कर्मचारी कॅम्पसला सोडून गेले आहेत.

- Advertisement -

उद्यान प्राधिकरणाने सांगितले की, सुमारे ४७ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक गेंडा, ४१ हॉग हरण, तीन जंगली डुक्कर यांचा समावेश आहे. या सर्वांचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाला. सोमवारी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जवळील एका गावात वाघ दिसला. या वाघाचे वय कमी असून तो बकऱ्याच्या कळपात देखील दिसला होता. या वाघाला वन विभागाने ताब्यात घेतले आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान सारखी परिस्थिती पोबीतोरा वन्यजीव अभयारण्याची झाली आहे. पोबीतोरा वन्यजीव अभयारण्याचा ८० टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. गेल्या २ महिन्यांपासून तिसऱ्यांदा या अभयारण्याचा भाग पाण्याखाली गेला आहे. या अभयारण्यामध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


हेही वाचा – कोरोना व्हायरसचा उगम चीनी लॅबमधूनच, चीनी संशोधकांच्या हवाल्याने अमेरिकेचा दावा!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -