घरदेश-विदेशसंसदेवर हल्ल्याच्या तयारीमध्ये खलिस्तानी दहशतवादी

संसदेवर हल्ल्याच्या तयारीमध्ये खलिस्तानी दहशतवादी

Subscribe

संसदेवर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये दोन दहशतवादी असल्याने सुरक्षा यंत्रणांना आता सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान नेपाळच्या सीमेवरून सफेद रंगाची इनोव्हा गाडी घेऊन लखविंदर सिंग आणि परविंदर सिंग हे दोन खलिस्तानी दहशतवादी निघाले आहेत.

खलिस्तानी दहशतवादी संसदेवर हल्ल्याच्या तयारीमध्ये असल्याची बातमी गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यानंतर संसद परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली. नेपाळ सीमारेषेवरून दोन खलिस्तानी दहशतवादी दिल्लीच्या दिशेने निघाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. UP – 26, AR – 24** असा या सफेद रंगाच्या इनोव्हा गाडीचा नंबर आहे. या गाडीतून लखविंदर सिंग आणि परविंदर सिंग हे खलिस्तानी दहशतवादी प्रवास करत असल्याची माहिती दिली गेली आहे. गुप्तचर यंत्रणा आणि निनावी कॉलद्वारे सारखीच माहिती हाती लागल्याने या गोष्टीचे गांभीर्य आता आणखी वाढले आहे. ज्या नंबरवरून फोन आला होता तो नंबर उत्तराखंडमधील असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान चोरीला गेलेली इनोव्हा कार देखील सारख्याच नंबरची असल्याने सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. लखविंदर सिंग आणि परविंदर सिंग या दोघांनीही नोव्हेंबर २०१६ साली पंजाबमधील नाभा जेलमधून पलायन केलेले आहे. खलिस्तान लिब्रेशन फोर्सचा प्रमुख हरमिनर सिंग मोन्टो याचे ह्दयविकाराने निधन झाल्याने लखविंदर सिंग आणि परविंदर सिंग दोघेही स्वत:ला खलिस्तान दलाचा प्रमुख समजत आहेत. दरम्यान लखविंदर सिंग आणि परविंदर सिंग यांचा २०१६ पासून शोध सुरू आहे. मात्र अद्याप दोघेही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. तसेच लखविंदर सिंग आणि परविंदर सिंग हे दोघेही विकी गाऊंडर या दहशतवाद्याच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. संसदेवरील संभाव्य हल्ल्याच्या बातमीने आता सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.

भारताबाहेर देखील खलिस्तानी दहशतवादी

खलिस्तानी दहशतवादी हे केवळ भारतामध्येच नाहीत तर भारताबाहेर देखील आहेत. इटली, ऑस्ट्रेलिया, युके आणि जर्मनीमध्ये देखील खलिस्तानी दहशतवादी असून भारतातील खलिस्तान चळवळीला त्यांचा पाठिंबा आहे. स्वतंत्र खलिस्तानची निर्मिती व्हावी यासाठी परदेशातील शिख देखील सढळ हस्ते मदत करत असतात. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेली आयएसआय देखील खलिस्तानींना पाठिंबा देत असून भारतामधील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

खलिस्तान म्हणजे काय?

स्वातंत्र्यपूर्व काळात १९४० साली लाहोरमधील अधिवेशनामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मंजुर झाला. मग हिंदू आणि मुस्लिमांसाठी असलेल्या देशांमध्ये शीखांना स्थान मिळणार का? आणि त्यातूनच मग शिखांचेही स्वतंत्र राष्ट्र असावे ही मागणी जोर धरू लागली. त्यानंतर डॉ. वीरसिंग भट्टी यांनी मार्च १९४० मध्ये पहिल्यांदा स्वतंत्र खलिस्तानची मागणी केली. त्यादिवसापासून आजपर्यंत शीखांचेही स्वतंत्र राष्ट्र असावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

२००१ साली संसदेवर हल्ला

१३ डिसेंबर २००१ या दिवशी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी संसदेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. गृहमंत्रालयाचे आणि संसदेचे स्टिकर असलेली कार सुरक्षा कवच भेदून संसदेच्या मुख्य गेटमधून आतमध्ये शिरली. यावेळी कारमधल्या एका दहशतवाद्याने स्वत:ला ग्रेनेडचे उडवून दिले. यावेळी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये १०० पेक्षा जास्त खासदार हजर होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ संसदेच्या सेंट्रल हॉलचे दरवाजे बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. संसदेवर हल्ला करून काही मंत्री आणि खासदारांना ओलीस ठेवण्याची दहशतवाद्यांची योजना होती. पण सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांची योजना उधळून लावली होती. अर्धा तास चाललेल्या चकमकीमध्ये सुरक्षा जवानांनी पाचही दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तर ५ जवान शहीद झाले होते आणि २ कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी अफजल गुरूला फाशी देण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -