पश्मिम बंगाल- पोलीस सीबीआयदरम्यान चोर पोलिसांचा खेळ

कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकण्याच्या काही वेळेनंतरच कोलकाता पोलिसांनी सीबीआयचे माजी प्रभारी संचालक एम. नागेश्वर यांच्या दोन वेगवेळ्या ठिकाणी छापे मारले आहेत.

Kolkata
CBI
प्रातिनिधिक फोटो

कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ने छापे मारल्याच्या काही वेळेतच कोलकाता पोलिसांनी सीबीआयला आपल्या निशान्यावर घेतले आहे. आज कोलकाता पोलिसांनी सीबीआयचे माजी प्रभारी संचालक एम. नागेश्वर यांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणांवर छापे टाकले आहे. त्यामुळे आता राजकारणाच्या जात्यात पोलीस आणि सीबीआय अडकले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

काय आहे प्रकरण

कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी रविवारी सीबीआयने अचानक धडक दिली होती. यानंतर राज्यातल्या ममता बॅनर्जी यांनी केंद्रांच्या विरोधात आघाडीच उघडली. याच्या काही तासातच कोलकाता पोलिसांनी सीबीआयचे माजी प्रभारी संचालक एम नागेश्वर राव यांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणांवर छापे घातले. या पैकी एक ठिकाण कोलकात्यात आहे तर दुसरं सॉल्ट लेकमध्ये आहे. सॉल्ट लेक येथे राव यांच्या पत्नीची एंजेलिना मर्केटाइल प्रा. लि. नावाची कंपनी आहे. गेले आठवडाभर ममता बँनर्जी विरुद्ध केंद्र सरकार अशी संघर्षाची ठिणगी तीव्र झाली असल्याचे चित्र आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची पदकं परत घेतली तर त्यांना राज्याचा सर्वोच्च बंग विभूषण देण्यात येईल असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते.