धक्कादायक! तरुणाने आपल्या आईसह पत्नीला जिवंत जाळले

हा प्रकार घडवून आणल्यानंतर आरोपी फरार

प्रातिनिधीक फोटो

उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि आईला जिवंत जाळले आणि जागीच ठार केले. हा प्रकार घडवून आणल्यानंतर आरोपी फरार झाला असल्याचे सांगितले जात आहे.

असा घडला प्रकार

सोनभद्र जिल्ह्यातील शक्तीनगर पोलिस स्टेशन परिसरातील खडिया बाजाराजवळ मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास या तरूणाने आपल्या पत्नी व आईला जिवंत जाळले. ही घटना घडवून आणल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनसह पिपरी सीओ व्हीएस मिश्रा घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी आलेल्या अधिका्यांनी जवळपासच्या लोकांची विचारपूस करून आरोपींचा शोध सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास खडिया येथील रहिवासी सद्दाम आणि त्याची पत्नी रुकसाना यांच्यात शुल्लक वाद झाला. याचा राग आल्याने युवकाने आपली पत्नी वयवर्ष २० असणारी रुकसाना हिच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. दरम्यान, बचावासाठी गेलेली आई सफिकुन निशा यांनाही आरोपींनी पेटवून दिले. यामुळे आरोपीची पत्नी आणि आई घरातच जळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आरडाओरडा ऐकून लोक घटनास्थळी दाखल झाले मात्र आरोपीने तेथून पळ काढला.

तर दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील दाखल झाले. पोलिसांनी हे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सासू व सुनेची अशाप्रकारे झालेल्या हत्येची खबर मिळताच परिसरात खळबळ उडाली.


अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेले तरुण सापडले; केंद्रीयमंत्री रिजीजूने दिली माहिती