पत्नीसाठी ताजमहाल बांधणाऱ्या ‘या’ इसमाचा मृत्यू

उत्तरप्रदेशात पत्नीच्या स्मरणार्थ मीनी ताजमहाल बांधणाऱ्या फैजल काद्री यांचं वयाच्या ८३व्या वर्षी निधन झालं आहे. अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेमुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

Lucknow
mini taj mahal
फोटो सौजन्य - हिंदुस्तान टाईम्स

ताजमहाल!प्रेमाचं प्रतिक म्हणून या वास्तुकडं आज जगभरात पाहिलं जातं. शहजाननं मुमताजसाठी बांधलेला आग्र्यातील ताजमहाल आजही जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातून लोक या ठिकाणी येतात. पण, तुम्हाला एक गोष्ट माहित आहे? की या एकविसाव्या शतकात देखील उत्तरप्रदेशमध्ये एक असाच शहाजहान होता, ज्यानं आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ छोटा ताजमहाल बांधला! त्याचं नाव आहे फैजल हसन काद्री! या फैजल हसन काद्री यांचं नुकतच वयाच्या ८३व्या वर्षी अपघाती निधन झालं आहे. फैजल हसन काद्री यांनी आपल्या पत्नीच्या स्नरणार्थ उत्तरप्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यामध्ये मीनी अर्थात छोटा ताजमहाल उभारला. ज्याची चर्चा सर्वत्र अगदी जोरात झाली. शुक्रवारी रात्री १० वाजता एका अनोळखी वाहनानं धडक दिल्यानं अलिगडमधल्या खासगी रूग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन वर्षापूर्वी देखील फैजल यांना सायकलवरून जाताना अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांना फ्रॅक्चर देखील झालं होतं.

प्यार की ताजमहालवाली कहानी

फैजल हसन काद्री आणि ताजामुली बेगम यांनी १९५३ साली लग्न केलं. २०११ साली ताजामुली बेगम यांचा मृत्यू झाला. या दाम्पत्याला मुलं नव्हतं. पत्नी  ताजामुली बेगमच्या मृत्यूनंतर फैजल हसन काद्री यांनी पत्नीच्या स्मरणार्थ छोटा ताजमहाल बांधण्याचा निर्णय घेतला. आपल्या पेन्शनमधून काही पैसे वाचवून फैजल काद्री यांनी २०१४ साली ताजमहाल बांधून पूर्ण केला. शिवाय, पत्नीचे काही दागिने आणि काही जमिन देखील काद्री यांनी विकली. पण, ताजमहालप्रमाणे संगमरवरी लाद्या बसवण्याचं काम मात्र पैशांच्या चणचणीमुळे पूर्ण होऊ शकलं नाही.

त्यानंतर २०१५ साली उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काद्री यांना बोलावून घेतलं. त्यानंतर अखिलेश यादव यांनी त्यांना अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी काद्री यांना पैसे देऊ केले. पण, फैजल काद्री यांनी अखिलेश यादव यांनी देऊ केलेली आर्थिक मदत नम्रपणे नाकारत मुलींसाठी शाळा बांधण्याची विनंती केली. शिवाय, त्यासाठी ४ गुंठे जमिन देखील देऊ केली. त्यानंतर कॉलेज बांधून पूर्ण देखील झालं.

पण, छोट्या ताजमहालचं बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी फैजल काद्री यांचं निधन झालं. त्यामुळे छोट्या ताजमहालचं बांधकाम पूर्णत्वाला नेण्याचा मानस फैजल काद्री यांच्या पुतण्यानं व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here