घरदेश-विदेशमंदसौर सामूहिक बलात्कार प्रकरण: बलात्काऱ्यांना फाशीच

मंदसौर सामूहिक बलात्कार प्रकरण: बलात्काऱ्यांना फाशीच

Subscribe

मंदसौरमध्ये एक ८ वर्षाची इयत्ता तिसरीत शिकणारी मुली शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी जात होती. घरी जाताना तेथील काही तरुणांनी तिला लाडूचे आमिष दिले आणि तिला आपल्यासोबत नेले. त्यांनी तिला निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

मध्यप्रदेशच्या मंदसौरमध्ये २६ जूनला एका आठ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या मुलीवर इतका अत्याचार करण्यात आला की, तिच्यावर ७ तास शस्त्रक्रिया करण्यात आली. या घटनेतील दोन आरोपींना आज विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्तींनी आरोपी इरफान (२०) आणि आसिफ (२४) यांना दोषी ठरवत त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. अवघ्या ५५ दिवसात फाशीची शिक्षा दिली म्हणून मंदसौरमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

काय झाले होते मंदसौरमध्ये ?

मंदसौरमध्ये एक ८ वर्षाची इयत्ता तिसरीत शिकणारी मुली शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी जात होती. घरी जाताना तेथील काही तरुणांनी तिला लाडूचे आमिष दिले आणि तिला आपल्यासोबत नेले. त्यांनी तिला निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिचा उशिरापर्यंत शोध सुरु होता. दुसऱ्या दिवशी २७ जूनला ही मुलगी सकाळी शहरातील एसटी स्टँडजवळील झुडुपात रक्तबंबाळ अवस्थेत सापडली. त्यानंतर लागलीच सीसीटिव्हीच्या मदतीने पोलिसांनी इरफान आणि आसिफ या दोन तरुणांना अटक केली. आरोपींवर १५ दिवसांनंतर म्हणजेच १० जुलै रोजी ३७६ डी (सामूहिक बलात्कार) ३७६(२एन), ३६६ (अपहरण), ३६३(अपहरण आणि छळ) आणि पॉक्सो अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले.

- Advertisement -
वाचा- मंदसौरमध्ये ७ वर्षाच्या मुलीवर पाशवी बलात्कार

व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे सुनावणी

घटनेचे पडसाद मध्य प्रदेशमध्ये असे काही उमटले की, आरोपींना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. लोकांचा रोष पाहता विशेष न्यायालयात त्यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे करण्यात आली. विशेष म्हणजे घटनेच्या ५५ दिवसांच्या आत आरोपींना ही फाशी सुनावण्यात आली आहे.

वाचा- ‘…मला मारुन टाका’,मंदसौर बलात्कार पीडित मुलीची आर्त मागणी

३५० पानांचे आरोपपत्र

घटनेच्या १५ दिवसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आले. पण हे आरोपपत्र तब्ब ३५० पानांचे होते. डॉक्टरांसह ९२ साक्षीदारांनी साक्ष दिली. याशिवाय आरोपपत्रासोबत ५० गोष्टी सादर करण्यात आल्या. ज्यात आरोपी इरफान आणि आसिफ यांनी मुलीला मारण्याची पूर्वतयारी केली असल्याचे पुरावे सादर करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -