घरक्रीडाव्हीव्हीएस आणि शेन वॉर्नच्या लवकरच येणार आत्मकथा

व्हीव्हीएस आणि शेन वॉर्नच्या लवकरच येणार आत्मकथा

Subscribe

दमदार बॅटिंग करणारा व्हीव्हीएस लक्ष्मण आणि जागतिक दर्जाचा स्पिनर शेन वॉर्न या दोघांचीही आत्मकथा लवकरच येत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दोघांचीही आत्मकथा येणार आहे.

आपल्या कलात्मक बॅटिंगनं सर्वांचं मन जिंकणाऱ्या माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मणची आत्मकथा लवकरच येणार असून हे पुस्तक बाजारात २० नोव्हेंबरला मिळेल. वेस्टलँड पब्लिकेशननं यासंदर्भात घोषणा केली असून भारतीय क्रिकेटरच्या या पुस्तकाचं नाव ‘२८१ एन्ड बियाँड’ असं असेल. २००१ मध्ये इडन गार्डन्समध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणनं धुवाधार बॅटिंग करत २८१ रन्स केल्या होत्या. याच खेळानंतरच भारतानं फॉलोऑनची नामुष्की मिळाल्यानंतरही टेस्टमध्ये यश संपादन केलं होतं. यावरूनच या पुस्तकाचं नाव ठेवण्यात आलं असावं असा अंदाज आहे.

शेन वॉर्नची आत्मकथा होणार प्रसिद्ध

शेन वॉर्न हा जगभरात अतिशय प्रसिद्ध आहे. या प्रसिद्ध स्पिनरची आत्मकथादेखील येत आहे. ‘नो स्पिन’ असं या आत्मकथेचं नाव असून ऑक्टोबरमध्ये या पुस्तकाचं प्रदर्शन करण्यात येईल. शेन वॉर्नची ओळख एक महान स्पिनर म्हणून जगभरामध्ये आहे. आपल्या क्रिकेट करिअर आणि खासगी आयुष्यातील माहीत नसलेल्या गोष्टी या पुस्तकातून शेन वॉर्न त्याच्या चाहत्यांसमोर आणणार आहे. याच वर्षी ऑक्टोबरमध्ये हे पुस्तक येणार आहे. इबरी प्रेसनं शेन वॉर्नचं पुस्तक ‘नो स्पिन’ हे जागतिक स्तरावर ४ ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात येईल. इबरीचे उपप्रकाशक अँन्ड्र्यूच्या म्हणण्यानुसार, ‘नो स्पिन’ या पुस्तकात वॉर्नबद्दल सर्व खऱ्या गोष्टी असून शीर्षकाशी समर्पक असतील. पुस्तकातील खरेपणामुळे शेन वॉर्नची आत्मकथा नक्की गाजेल असा विश्वासही त्यांनी दर्शवला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टेस्ट आणि वनडे या दोन्हीमध्ये १००० विकेट्स घेणाऱ्या शेन वॉर्नला या खेळामधील महान बॉलर मानलं जातं. तर टेस्ट क्रिकेटमध्ये ३००० पेक्षा जास्त रन्स त्यानं बनवले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -