बॅगेत आढळला डोकं नसलेला मृतदेह

दिल्ली येथील घटना- निघृण हत्या करुन केले मृतदेहाचे तुकडे भरले बॅगेत.

New Delhi
Head less Dead body
प्रातिनिधिक फोटो

देशाची राजधानी दिल्ली येथील तिमारपुर परिसरात असलेल्या एका बस स्थानकाजवळ मृतदेह आढळला आहे. क्रुरतेने खून करून मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आहेत. मृतदेहाचे फक्त धडच या बॅगेत ठेवण्यात आले असल्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण आहे. या मृतदेहाचे हाथही कापण्यात आले आहेत. मृतदेहाला डोक नसल्यामुळे त्याची ओळख पटण्यास पोलिसांना अडचन येत असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. मृतदेह पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी तिमारपुर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त नूपुर प्रसाद यांनी दिलेल्या माहिती नुसार हा मृतदेह ३२ वर्षीय इसमाचा आहे. त्याच्या जवळ कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसल्याने त्याची ओळख पटली नाही. मागील काही महिन्यांपासून हरवलेल्या लोकांची यादी ही पोलीस तपासत आहे. रविवारी सकाळी यापरिसरातून जात असलेल्या एका व्यक्तीला ही बॅग आढळली. बॅगेत असलेला मृतदेह पाहून त्याने पोलिसांनी याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस येण्या अगोदर या परिसरात एकच गर्दी जमली होती. यामृतदेहाचे हाथ आणि पाय कापले असल्याने बॅग रक्ताने माखली होती. पोलिसांनी या मृतदेहाला ताब्यात घेऊन शवविच्छदेनासाठी पाठवले.

बॅगेवर सन्नी टेलर असा दिल्ली बाहेरील पत्ता होता. पोलिसांनी सांगितल आहे की या नावाचा दिल्लीत कोणताही परिसर नाही. या नावाशी मिळत्या जुळत्या परिसरात पोलिसांनी आपले शोध पथक पाठवले आहेत. मात्र अद्यापही त्याची ओळख पटली नाही. या घटनास्थळा जवळच एका पेट्रोलपंप आहे. पंपावर बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

मार्च महिन्यात ही असाच प्रकार घडला असून याघटनेत एक महिला आणि अल्पवयीन मुलाचे डोके कापून फेकण्यात आले होते. उत्तर प्रदेश येथील संभाल जिल्ह्यात ही घटना घडली. याघटने नंतर गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here