घरट्रेंडिंग#MeToo मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा - शक्ती कपूर

#MeToo मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा – शक्ती कपूर

Subscribe

एकेकाळी मिस इंडिया आणि नंतर बॉलीवूड अभिनेत्री राहिलेली तनुश्री दत्ता सध्या मीडियामध्ये चर्चेचा विषय बनली आहे. या अभिनेत्रींने २००८ साली झालेले एक प्रकरण पुन्हा एकदा बाहेर काढलं आणि संबंध बॉलिवूड हादरुन गेलं आहे. तनुश्रीनंतर आता अनेक अभिनेत्री त्यांच्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात सोशल मीडियातून व्यक्त होताना दिसत आहेत. या वादळात अनेक बॉलिवूड, राजकारण, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर या वादळात अडकलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे वादळ वाढत चालल्याचे दिसून येत आहे. मात्र आता या मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदींने हस्तक्षेप करावा असे विधान बॉलिवूडचे ‘बॅड बॉय’ शक्ती कपूर यांनी एका ऑडिओ क्लिपमध्ये केले असल्याची माहिती एका मराठी वृत्त वाहिनीने प्रसारित केली आहे. तसेच या MeTooच्या मोहिमेत ७० टक्के मुली ब्लॅकमेल करत आहेत. तर आरोप सिद्ध होईपर्यंत त्याचे नाव जाहीर करु नये असे देखील त्यांनी त्या म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -