घरदेश-विदेशफरार पोलीस अधिकारी दहशतवादी संघटनेत?

फरार पोलीस अधिकारी दहशतवादी संघटनेत?

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथून एके-४७ रायफल घेऊन फरार झालेला पोलीस अधिकारी दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचे समोर आले आहे. पंपोर पुलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारा इफरान अहमद हा पोलीस अधिकारी बुधवारी सकाळी फरार झाला. हा पोलीस अधिकारी हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचे समोर आले आहे. या दहशतवादी संघटने यासंदर्भात दावा केला आहे. पंपोर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांना धक्का बसला.

- Advertisement -

फरार पोलीस दहशतवादी संघटनेत सहभागी

जम्मू-काश्मीरच्या पंपोर पोलीस स्टेशनमध्ये इफरान अहमद हा विशेष पोलीस अधिकारी पदावर कार्यरत होता. बुधवारी सकाळी इरफान अहमद एके-४७ रायफल घेऊन फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासामध्ये या पोलिसाने सरकारी एसाल्ट रायफल, दोन मॅगजीन आणि काही काडतूस घेऊन फरार झाला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी इरफानचा शोध घेण्यास सुरुवात केली. इफरानचे शेवटचे लोकेशन पुलवामा येथील लूलीपोरा नेवासाजवळचे होते. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी या परिसराला घेराव घातला आणि सर्च ऑपरेशन सुरु केले. त्यावेळी फरार पोलीस अधिकारी हा आमच्या संघटनेमध्ये सहभागी झाल्याचा दावा हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने केला.

फरार पोलीस राहणाऱ्या भागात दहशतवाद्यांचा प्रभाव

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार पोलीस अधिकारी ज्या भागामध्ये राहत होता तिथे दहशतवाद्यांचा प्रभाव होता. कोकपोरा आणि अन्य ६ भागांमध्ये रहाणारे अनेक तरुण गेल्या दोन वर्षामध्ये दहशतवादी बनले आहेत. या भागामध्ये जेव्हा जवानांनी सर्च ऑपरेशन केले तेव्हा त्यांच्यावर स्थानिक तरुणांनी दगडफेक केली होती.

- Advertisement -

जम्मू-काश्मीर पोलिसांकडून अधिकृत माहिती नाही

फरार झालेल्या पोलीस अधिकाऱ्यासंदर्भात जम्मू-काश्मीर पोलिसांनी अद्याप कोणतिही अधिकृत माहिती दिलेली नाही. या पोलीस अधिकाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. हा पोलिस अधिकारी कोणत्या परिस्थितीत फरार झाला, कुठून फरार झाला यासर्व बाबींचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तो दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाला यासंदर्भात कोणताही पुरावा नसल्याचे जम्मू-पोलिसांनी सांगितले आहे.

नोकरी सोडा आणि आमच्या संघटनेत सहभागी व्हा

हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता गाजी बुरहानुदीन याने स्थानिक न्यूज एजन्सीला फोनवरुन माहिती दिली की, पोलीस अधिकारी इरफान अहमद फरार झाला नाही. तर त्याने पोलिसाची नोकरी सोडून हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा पोलीस अधिकारी अन्य काही तरुणांसोबत सुरक्षित ठिकाणी आहे. तसंच या हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीर पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व जवानांना नोकरी सोडून हिजबुल मुजाहिदीनमध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जिहादला यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी या पोलिसांना केले आहे.

अनेक पोलीस दहशतवादी संघटनेत सहभागी

गेल्या काही महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीरमधील अनेक पोलीस शस्त्र घेऊन फरार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एप्रिल महिन्यामध्ये दक्षिण काश्मीरमधून फरार झालेला जवान इदरीन मीर हा हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाल्याचे समोर आले होते. तर मे मध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल ४ रायफल घेऊन फरार झाला होता. एक दिवसानंतर हा पोलीस कॉन्स्टेबल हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाल्याचे समोर आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -