प्रियकराच्या साथीने पत्नीने पतीची केली हत्या; जमावाने केलं दोघांनाही ठार

mob killed three after woman kills husband with the help of lover

झारखंडमध्ये प्रियकराच्या साथीने पत्नीने पतीची हत्या केल्याने जमावाने त्या दोघांनाही ठार केल्याची घटना समोर आली आहे. पतीची हत्या केल्या प्रकरणी एका महिलेसह तिघांना जमावाने ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुमला जिल्ह्यातील डेंगडीह खेड्यातील रहिवासी मारियानास कुजूर याची पत्नी नीलम कुजूर आणि तिचा प्रियकर सुदीप दुंडंग या दोघांनी हत्या केली होती. त्यामुळे जमावाने पत्नीसह तीघांची बेदम मारहाण करत हत्या केली.

नोंगा येथील रहिवासी सुदीप सोमवारी आपल्या मित्र पाकी कुल्लूसमवेत नीलमला भेटण्यासाठी डेंगडीह गावात पोहोचला. गावातच प्रियकर सुदीपने प्रेयसीच्या पतीच्या हत्येचा कट रचला आणि रात्री त्याची हत्या केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तिन्ही आरोपींना आमिष दाखवून लोकांसमोर नेलं. यानंतर तिथल्या ग्रामस्थांनी तिघांना मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहणीत तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चारही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. लिंचिंगमध्ये सामील असलेल्यांना अटक करण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे.


हेही वाचा – Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरात होणार युट्यूबर कॅरी मिनाटीची एंट्री?