घरदेश-विदेशनिवडणूक संपल्यानंतर 'नमो टीव्ही' चॅनल गेले कुठे?

निवडणूक संपल्यानंतर ‘नमो टीव्ही’ चॅनल गेले कुठे?

Subscribe

लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर सुरु झालेले 'नमो टीव्ही' चॅनल आता अचानक गायब झाले आहे. त्यामुळे हे चॅनल नेमके गायब कसे झाले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत फक्त भाजपच्याच प्रचारासाठी हे चॅनल सुरु करण्यात आले होते का? असा प्रश्न प्रेक्षकांकडून विचारण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये ‘नमो टीव्ही’चा मु्द्दा देखील प्रचंड गाजला. ‘नमो टीव्ही’ हे चॅनल ग्राहकांसाठी मोफत होते. याशिवाय या चॅनलला भाजपने फंडींग केले होते. त्यामुळे विरोधकांनी ‘नमो टीव्ही’चा मुद्दा लावून धरला होता. विरोधकांच्या बोलण्यात तथ्य असल्याचे जाणवत आहे. कारण लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर सुरु झालेले ‘नमो टीव्ही’ सातव्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर गायब झाले आहे. ‘नमो टीव्ही’वर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण, शासनाच्या विविध योजनांवर आधारीत चित्रपट आणि भाजपला समर्थन करणाऱ्या बऱ्याच गोष्टी दाखवल्या जायच्या.

फ्रि टू एअर होतं ‘नमो टीव्ही’

‘नमो टीव्ही’ सगळ्या सेट ऑफ बॉक्स आणि डिश टिव्हीवर २६ मार्च पासून दिसायला लागले. हे चॅनल फ्रि टू एअर असल्या कारणामुळे ग्राहकांसाठी मोफत होते. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत हे चॅनल प्रचंड चालले. या चॅनलवर भाजप पक्षाशी निगडीत बऱ्याच गोष्टी दाखवल्या गेल्या.

- Advertisement -

विरोधकांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

‘नमो टीव्ही’ संदर्भात विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. निवडणूक आयोगाने या संदर्भात माहिती व प्रसार (आय अण्ड बी) मंत्रालयाकडे स्पष्टीकरण मागितले. आय अॅण्ड बी ने स्पष्टीकरणात म्हटले होते की, ”नमो टीव्ही’ हे जाहीरातीचे चॅनल आहे ज्याचा खर्च भारतीय जनता पक्ष करते.’ त्यामुळे ते भाजपचे प्रचाराचे खुले व्यासपीठ असल्याचे आय अॅण्ड बी ने म्हटले होते. यासोबतच आय अॅण्ड बीने हे देखील स्पष्ट केले होते की, ”नमो टीव्ही’ हे नोंदणीकृत चॅनल नाही, त्यामुळे त्याला काय प्रसारित करावे याची परवानगी घेण्याची गरज नाही.’

निवडणूक आयोगाने उचलले होते पाऊल

विरोधकांचा ‘नमो टीव्ही’वरील वाढती टीका पाहून निवडणूक आयोगाने ‘नमो टीव्ही’च्या विरोधात पाऊल उचलले होते. ‘नमो टीव्ही’त प्रसारित होणाऱ्या सर्व नियोजित कार्यक्रमांची आयोगाकडून अगोदर परवानगी घ्यावी, असे निवडणूक आयोगाने सांगितले. याशिवाय निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांनी भाजपला देखील दम दिला होता. निवडणूक आयोगाच्या परवानगी शिवाय भाजपने काहीही ‘नमो टीव्ही’वर प्रसारित करुन नये, असे निवडणूक आयोगाकडून भाजपला सांगण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -