Saturday, August 8, 2020
Mumbai
27 C
घर देश-विदेश Live : देशाच्या विकासामध्ये तरूणांचे मोठे योगदान – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Live : देशाच्या विकासामध्ये तरूणांचे मोठे योगदान – पंतप्रधान नरेंद्र मोदी

New Delhi
narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात मोठ्या हॅकथॉनच्या ग्रँड फिनालेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत आहेत. या त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशीन म्हटले की, या कठिण परिस्थितीमध्येही प्रयोगशील राहणे हे आव्हानात्मक आहे. ज्या आव्हानांचा तुम्ही सामना करता आहात, ते जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, आपल्या सोयी-सुविधा अधिक प्रभावी, इंटरॅक्टीव्ह आणि लोकांसाठी उपयुक्त बनवण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजेंस ही सुसह्य होऊ शकते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना म्हटले की, आजच्या तरुण पिढीचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. ही पिढी डेटा – संचालित समाधानासोबतच हेल्थकेअर समाधानातही मोठा बदल करत आहेत. गरीब वस्त्यांमध्ये यामुळे स्वस्त दरात आरोग्य सेवा मिळत आहे. केंद्र सरकारचा आयुष्मान भारतच्या माध्यमातून हाच उद्देश आहे.

पुढे पंतप्रधान म्हणाले की, महिलांच्या स्वच्छतेचे महत्त्व खुप उशीराने पटले. गेल्या सहा वर्षात महिला या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. या संबंधीत नरेंद्र मोदी यांनी आधी ट्विट करत म्हटले की, स्मार्ट इंडिया हॅकथॉन आयडिया आणि आविष्कारचे जीवंत फोरम उभे राहिले आहे. या माध्यमातून आपले तरूण नवनवीन संशोधनात कोरोनाच्यानंतरच्या विकासासाठी काम करत आहेत. तसेच आत्मनिर्भर भारतावरही लक्षकेंद्रीत करत आहेत.

हेही वाचा –

चिंताजनक! गेल्या २४ तासांत २३२ पोलिसांना कोरोनाची लागण