घरदेश-विदेशभारतीय सैन्याने FB, TikTok सह ८९ Apps वर घातली बंदी!

भारतीय सैन्याने FB, TikTok सह ८९ Apps वर घातली बंदी!

Subscribe

या बॅन केलेल्या अॅप्सना १५ जुलैपर्यंत आपापल्या फोनमधून डिलीट करण्यास भारतील सैन्यातील जवानांना सांगण्यात आले आहे.

भारतीय सैन्याने आपल्या सर्व जवानांसाठी बऱ्याच मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये एकूण ८९ मोबाईल अॅप्लिकेशन्सवर बंदी घातली असून त्यात फेसबुक, टिकटॉक आणि इंस्टाग्रामचा देखील समावेश आहे. या बॅन केलेल्या अॅप्सना १५ जुलैपर्यंत आपापल्या फोनमधून डिलीट करण्यास भारतील सैन्यातील जवानांना सांगण्यात आले आहे. दरम्यान हे ८९ अ‍ॅप्स डिलीट करण्यास सांगितले गेले आहेत त्यात फक्त सोशल मीडिया अॅप्सच नाही तर बरेच गेमिंग आणि ई-कॉमर्सच्या अ‍ॅप्स समावेश आहे.

सैन्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लष्करातून बाहेर पडणारी माहिती रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सैन्याच्या संवेदनशील माहितीच्या लीक होण्याचा हवाला देत, हा निर्णय घेण्यात आला आहे. लष्कराने म्हटले आहे की, ज्यांच्या कोणाच्या मोबाईलमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम व्यतिरिक्त हे इतर ८९ अॅप्स आढळतील. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल

- Advertisement -

facebook, TikTok आणि Instagram शिवाय Snapchat, songs.pk, WeChat, Hike, TikTok, Likee, Shareit, True Caller, PUBG, Tinder यासारख्या अॅप्सवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने बंदी घातलेल्या चीन अॅप्सचा देखील यामध्ये समावेश आहे.  गेल्या आठवड्यात भारताने चीनमधील लोकप्रिय मोबाइल अॅप्सवर बंदी घातली होती, ज्यात लोकप्रिय टिकटॉक आणि यूसी ब्राउझरसारख्या अॅप्सचा समावेश आहे. सरकारने सांगितले की, ही अॅप्स देशाच्या सार्वभौमत्व, अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक आहेत.

- Advertisement -

लडाख प्रदेशातील नियंत्रण रेषेवरील चिनी सैन्यांबरोबर सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत हे निर्बंध लादले गेले आहेत. बंदी घातलेल्या यादीमध्ये वेचॅट, बीगो लाइव्ह, हॅलो, लाईकी, कॅम स्कॅनर, व्हीगो व्हिडिओ, एमआय व्हिडिओ कॉल – शाओमी, एमआय कम्युनिटी, क्लेश ऑफ किंग्ज तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म क्लब फॅक्टरीचा समावेश आहे. अशा परिस्थितीत या निर्णयामुळे चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचे नुकसान झाले आहे. भारतात टिकटॉकचे २०० कोटीहून अधिक युजर्स आहेत, तर भारतात शाओमी सर्वात मोठा मोबाइल ब्रँड आहे.

तसेच केंद्र सरकारने TikTok सह इतर अनेक चीनी Apps वर बंदी घातल्यानंतर आता जगभरातील देशांमध्ये चीनविरूद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी मंगळवारी ट्विट केले की, अमेरिका सरकार प्रसिद्ध लोकप्रिय आणि सर्वाधिक युजर्स असणाऱ्या TikTok सह इतर चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ऑस्ट्रेलियानेही टिक-टॉकसह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणण्याविषयी सांगितले होते.


भारतानंतर अमेरिकाही TikTok सारख्या चीनी App वर बंदी घालण्याच्या तयारीत!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -