घरदेश-विदेशEngineer's Day 2020 : जाणून घ्या महान अभियंता डॉ. विश्वेश्वरया यांच्या विषयी

Engineer’s Day 2020 : जाणून घ्या महान अभियंता डॉ. विश्वेश्वरया यांच्या विषयी

Subscribe

आज ‘इंजिनियर्स डे’ म्हणजेच ‘अभियंता दिन’ आहे देशाच्या विकासात अभियंत्यांचा मोठा वाटा आहे. आपत्तीपासून ते बांधकामापर्यंत, अभियंत्यांशिवाय काहीही करता येऊ शकत नाही. अभियंते हे देशाच्या विकासाचे चालक आहेत. महान भारतीय अभियंता भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांच्या जयंतीनिमित्त भारतात दरवर्षी १५ सप्टेंबरला अभियंता दिन साजरा केला जातो. एम. विश्वेश्वरयांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० रोजी म्हैसूर (कर्नाटक) येथे झाला. विश्वेश्वरया यांच्या प्रयत्नांमुळेच कृष्णराजसागर धरण, भद्रावती आयर्न आणि स्टील वर्क्स, म्हैसूर चंदन तेल आणि साबण कारखाना, म्हैसूर विद्यापीठ, बँक ऑफ म्हैसूर हे बांधता आलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच म्हैसूर विद्यापीठाची स्थापना झाली. १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

सर एम. विश्वेश्वरयांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी

म्हैसूरमध्ये सुरुवातीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बेंगळुरूमधील ‘सेंट्रल कॉलेज’ मध्ये प्रवेश घेतला पण कॉलेजची फी द्यायला पैसे नव्हते, त्यानंतर त्याने शिकवणी घ्यायला सुरूवात केली आणि पुढे अभ्यास सुरू ठेवला. १८८१ मध्ये बीएनंतर स्थानिक सरकारच्या मदतीने त्यांनी अभियांत्रिकीच्या अभ्यासासाठी पुण्याच्या ‘विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला. १८८३ च्या एल.सी.ई. आणि एफ.सी.ई. (सध्या बीई पदवी) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला. त्यांची पात्रता पाहून महाराष्ट्र सरकारने त्यांना नाशिकमधील सहाय्यक अभियंता पदावर नियुक्त केलं. ज्यावेळी त्यांनी अभियांत्रिकी कारकीर्दीची सुरुवात केली त्यावेळी भारतात ब्रिटिशांचे राज्य होतं.

- Advertisement -

विश्वेश्वरया यांनी आपल्या क्षमतेने ब्रिटीश अभियंत्यांना त्यांची क्षमता व कौशल्य पटवून दिलं. नैसर्गिक पाणी स्त्रोतांपासून प्रत्येक घरा-घरात पाणी पोहोचवण्याची व्यवस्था आणि गलिच्छ पाण्याचा निचरा करण्यासाठी त्यांनी ड्रेनेज वाहिन्यांची योग्य व्यवस्था केली. १९३२ मध्ये ते कृष्णराज सागर धरणाच्या बांधकाम प्रकल्पात मुख्य अभियंता म्हणून काम पाहत होते. ‘कृष्णराज सागर’ धरणाचे बांधकाम सोपं नव्हतं कारण त्यावेळी देशात सिमेंट तयार नव्हतं. पण त्यांनी हार मानली नाही आणि अभियंत्यांच्या सहकार्याने सिमेंटपेक्षा मजबूत ‘मोर्टार’ तयार केला. त्यांनी धरण बांधलं आणि आजही ते धरण मजबूत आहे. हे धरण त्यावेळी आशियातील सर्वात मोठे धरण असल्याचं म्हटलं जात होतं. कावेरी, हेमावती आणि लक्ष्मण तीर्थ नद्या या धरणाशी जोडल्या गेलेल्या आहेत.

इतर क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान

केवळ अभियांत्रिकी क्षेत्रातच नव्हे तर एम. विश्वेश्वरया यांनी बर्‍याच क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. देशातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळावं यासाठी अनेक कृषी, अभियांत्रिकी आणि औद्योगिक महाविद्यालये उघडली. दक्षिणेकडील बंगळुरुमधील जयनगर परिसराची रचना आणि नियोजन एम. विश्वेश्वरया यांनी केलं आहे. आशियातील सर्वात नियोजित मांडणींपैकी एक जयनगर आहे जे एम. विश्वेश्वरया यांनी डिझाइन केला होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -