घरदेश-विदेश'निपाह' ची दहशत वाढतेय... मृतांची संख्या १४वर

‘निपाह’ ची दहशत वाढतेय… मृतांची संख्या १४वर

Subscribe

केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून ‘निपाह’ने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे निपाहची दहशत केरळमध्ये कायम आहे. आता मृतांचा आकडा १४ वर गेला असून आणखी दोन रुग्णांना या आजाराची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे केरळमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती अधिक चिंताजनक बनत चालली आहे.

दोन आठवड्यांपासून केरळमधल्या कोझीकोडे आणि मल्लपुरम भागात मृत्यूतांडव सुरु आहे. निपाह व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ताप, अंगदुखी, मळमळ अशी या आजाराची काही लक्षणे आहेत. या विषाणूची लागण झाल्याच्या  अवघ्या ४८ तासात  रुग्ण दगावतात. पहिल्यांदा केरळमधल्या कोझीकोडे भागात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानंतर या विषाणूचे निदान झाले होते.

- Advertisement -

वटवाघुळामुळे ‘निपाह’ नाही?

‘निपाह’ विषाणूची लागण वटवाघळांपासून होते, हे कळाल्यानंतर केरळ आरोग्य विभागाने कोझीकोडे आणि मल्लपुरम भागातील वटवाघळांची तपासणी केली. या तपासणीत निपाहचा विषाणू सापडला नाही. शिवाय या परीसरातील डुकरांच्या मलमुत्राचीही चाचणी करण्यात आली असून यातही ‘निपाह’चा विषाणूचा आढळला नाही. त्यामुळे आता विषाणू नेमका कशात आहे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

इतर राज्यांमध्ये  ‘हाय अलर्ट’

केरळमधील कोझीकोडे, मल्लपुरम भागात विषाणूचा संसर्ग झाला आहे. पण जवळच्या राज्यांमध्ये  या आजाराची फैलाव होऊ नये यासाठी हाय अलर्ट देण्यात आला आहे. बिहार, सिक्कीम, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश असून निपाहची कोणतीही लक्षणं आढळल्यास त्वरीत चाचणीचा सल्ला देण्यात आला आहे.

पर्यटकांची केरळकडे पाठ

उन्हाळी सुट्टयांसाठी केरळला भेट देणाऱ्यांची संख्या अधिक असते. विशेषत: जूनच्या सुरुवातीला पर्यटक केरळच्या सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. परंतु सध्या ‘निपाह’ची दहशत पाहता अनेकांनी सहली रद्द केल्याचे कळत आहे. केरळ जवळील सगळ्या पर्यटन स्थळांवर देखील पर्यटकांनी जाणे टाळले आहे.

गोव्यातही निपाह दाखल

‘निपाह’ विषाणूने केरळातील नागरीक हैराण असताना आता गोव्यात या विषाणूची लागण झालेला एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता या विषाणूची भिती महाराष्ट्रालाही असल्याचे म्हटले जात आहे.

काय आहे ‘निपाह’ ?

nipha_virus
निपाह व्हायरस

‘निपाह’ पहिल्यांदा १९९८ – ९९ साली मलेशिया आणि सिंगापूरमध्ये आढळला होता. घरगुती डुक्कर आणि इतर पाळीव प्राण्यांमध्ये हा विषाणू सापडला.  हा विषाणू संसर्गजन्य असल्यामुळे प्राण्यांमधून तो माणसांत आला. शिवाय पक्षांद्वारे देखील हा आजार पसरल्याचे समोर आले होते. यामध्ये फ्रूट बॅटचा समावेश होता, अशी माहिती या आधी समोर आली होती. त्यामुळे केरळमध्ये हा विषाणू आढळल्यानंतर वटवाघळांमुळे हा आजार पसरत असल्याचे समोर आले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -