घरदेश-विदेशमल्ल्या-मोदीच नाही तर ३६ महाभाग देशाला चुना लावून पळाले

मल्ल्या-मोदीच नाही तर ३६ महाभाग देशाला चुना लावून पळाले

Subscribe

ईडीने न्यायालयात माहीती दिली आहे की, फौजदारी गुन्हे झालेले ३६ उद्योगपती विदेशात पळाले आहेत. यामध्ये विजय मल्या, मेहुल चोक्सी, ललित मोदी, नीरव मोदी यांच्याही नावांचा समावेश आहे.

ऑगस्टावेस्टलॅंड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुशेन मोहन गुप्ता याच्या जामीन अर्जाला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विरोध केला आहे. सुशेनला जामीन मिळाला तर तो देखील विजय मल्या आणि नीरव मोदी प्रमाणे विदेशात पळून जाईल, असे ईडीने न्यायालयात म्हटले आहे. यासोबतच ईडीने न्यायालयात माहीती दिली आहे की, फौजदारी गुन्हे झालेले ३६ उद्योगपती विदेशात पळाले आहेत. यामध्ये विजय मल्या, मेहुल चोक्सी,ललित मोदी, नीरव मोदी यांच्याही नावांचा समावेश आहे.

सुशेन गुप्ताचा अनोखा युक्तिवाद

सुशेन गुप्ताने जामीन मिळावा यासाठी अनोखा युक्तीवाद केला. आपले समाजातील सर्वदूर संबंध आहेत. त्यामुळे आपण कुठेही जाणार नाहीत, असा दावा त्याने केला. यावर ईडीने त्याला खडेबोल सुनावले. ‘विजय मल्या, मेहुल चोक्सी,ललित मोदी, नीरव मोदी, स्टर्लिग बायोटेकचे प्रवर्तक संदेसरा बंधू यांचेही समाजात सर्वदूर संबंध होते. मात्र, तरीही ते पळून गेले. गेल्या काही वर्षामध्ये अशाप्रकारचे ३६ उद्योगपती पळून गेले’, असे ईडीचे वकील डी. पी. सिंह आणि एन. के. मट्टा यांनी कोर्टात सांगितले. त्यामुळे आता गुप्ताच्या याचिकेवर २० एप्रिलला सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता महत्त्वाच्या टप्प्यावर आला असून गुप्ताच्या डायरीतील ‘आरजी’चा शोध सुरु असल्याचे ईडीचे वकीलांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -