घरदेश-विदेशछत्तीसगडमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा खात्मा

छत्तीसगडमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा खात्मा

Subscribe

ओरछा पोलीस स्टेशन हद्दीत ही चकमक सुरु असून जवानांना एक नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे.

छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत एका नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर या चकमकीत एक पोलीस जखमी झाला आहे. जखमी पोलिसावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळावरुन पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ओरछा पोलीस स्टेशन हद्दीत ही चकमक सुरु आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा निर्णाण करण्यासाठी नक्षलवाद्यांच्या कारवाया सुरु आहेत. दरम्यान, आज पहाटे नक्षलवाद्यांनी नारायणपूर येथील एका मतदान केंद्राजवळ आयईडीचा स्फोट घडवून आणला होता. त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये हायअलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. मतदान केंद्रावर कालच सर्व तयारी झाली होती. मतदान सुरु होण्याआधी आज पहाटे नक्षलवाद्यांनी मतदान केंद्राजवळ आयईडीचा स्फोट घडवून आणला. आयटीपीबीचे जवान मतदानासाठी केंद्रावर जात असतानाच हा स्फोट झाला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.

दरम्यान, सकाळची घटना ताजी असतानाच काही वेळापूर्वी नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु झाली. ओरछा पोलीस स्टेशन हद्दीत ही चकमक सुरु असून जवानांना एक नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. दरम्यान चकमक सुरु असून जवानांकडून नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -