घरदेश-विदेशसीबीआयने अखेर चिदम्बरम यांना घेतलं ताब्यात

सीबीआयने अखेर चिदम्बरम यांना घेतलं ताब्यात

Subscribe

गेल्या २ दिवसांपासून चिदम्बरम यांच्या अटकेवरून सुरू असलेल्या नाट्याचं रूपांतर बुधवारी अखेर हाय व्होल्टेज ड्रामामध्ये झालं. उच्च न्यायालयाने चिदम्बरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अखेर सीबीआयने त्यांच्या जोरबाग येथील घरून त्यांना ताब्यात घेतलं. मात्र, त्याआधी त्यांच्या घराबाहेर झालेला ड्रामा सगळ्या देशानं पाहिला. त्याच्या काही मिनिटं आधीच चिदम्बरम यांनी काँग्रेसच्या कार्यालयात जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोप फेटाळले होते. ‘माझ्यावर कोणतीही चार्जशीट नाही, आरोप दाखल नाही, त्यामुळे मी गायब होण्याचा प्रश्नच नाही’, असा दावा चिदम्बरम यांनी पत्रकार परिषदेत केला होता. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत चिदम्बरम यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.

- Advertisement -

असा घडला हाय व्होल्टेज ड्रामा!

दरम्यान, चिदम्बरम यांना सीबीआयने ताब्यात घेण्याआधी त्यांच्या जोरबागच्या घराबाहेर मोठा ड्रामा झाला. त्यांच्या घराबाहेर जमा झालेल्या सीबीआयच्या आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना इमारतीमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर अखेर सीबीआयच्या अधिकाऱ्यांना कंपाऊंडवरून उडी मारून आत जावं लागलं. तोपर्यंत इमारतीच्या बाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. हे कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी यांच्यात अनेकदा बाचाबाची देखील झाली. कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांच्या नाकी नऊ येत होते. एकीकडे घराबाहेर हा ड्रामा सुरू असताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांना घरात जायला मात्र मिळत नव्हतं. तब्बल दीड ते दोन तास हा ड्रामा सुरू होता. अखेर सीबीआच्या अधिकाऱ्यांनी चिदम्बरम यांच्या घरात जात त्यांची चौकशी केली आणि त्यांना ताब्यात घेतलं.


हेही वाचा – अखेर २७ तास अदृश्य असलेले चिदम्बरम पत्रकार परिषदेत प्रकटले, म्हणाले…!

कार्ती चिदम्बरम यांची टीका

दरम्यान, पी. चिदम्बरम यांची चौकशी आणि त्यांच्या घराबाहेर सरकारी अधिकाऱ्यांनी केलेला ड्रामा हा राजकारणाने प्रेरित होता, अशी प्रतिक्रिया चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदम्बरम यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये हा ड्रामा सुरू असताना ट्वीटरवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, चेन्नईमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी या सगळ्याचं खापर भाजपवर फोडलं आहे. ‘हे सगळं भाजपनंच घडवून आणलं आहे’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -