घरदेश-विदेशVideo: पाकिस्तानचे मंत्री म्हणतात काश्मीरमध्ये इंटरनेट देऊ

Video: पाकिस्तानचे मंत्री म्हणतात काश्मीरमध्ये इंटरनेट देऊ

Subscribe

काश्मीरला इंटरनेट उपलब्ध करून देण्याच्या वक्तव्यावरुन पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसेन चौधरी यांना नेटकरी जोरदार ट्रोल केलं.

पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसेन चौधरी नेहमी अतार्किक वक्तव्य करत असतात. आता पुन्हा एकदा ते त्याच्या अतार्किक वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. काश्मीरमधील लोकांसाठी त्यांनी इंटरनेट उपलब्ध करून देण्याविषयी बोलले. यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं आहे. ते असं म्हणाले की, ‘आजच्या युगात इंटरनेट हा लोकांचा मुलभूत हक्क आहे. त्यामुळे आम्ही काश्मीरमधील लोकांना उपग्रहाद्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करत आहोत. यासाठी आम्ही राष्‍ट्रीय एजेंसी स्‍पेस अँड अपर एटमॉस्फियर रिसर्च कमिशन (सुपारको) यांच्याशी संपर्क साधणार आहे.’

- Advertisement -

यादरम्यान त्यांनी सुपारकोचे नाव ‘स्प्राको’ असं चुकीचा उच्चार केला. त्यामुळे देखील त्यांना सोशल मीडियावर व्हायरल केलं जात आहे.

- Advertisement -

 

पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी असं ट्विट केलं आहे की, ‘पाकिस्तानच्या लोकांनी यशस्वीरित्या ५५ किमी साठी हेलिकॉप्टर सवारी दिल्यानंतर आता फवाद चौधरी उपग्रहाद्वारे काश्मीर लोकांना इंटरनेट देणार आहे.’ तसंच त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 

तर दुसऱ्या पाकिस्तान वापरकर्त्याने लिहिलं, ‘प्लीज उपग्रह युद्धाचा खेळ खेळू नका. पाकिस्तानसाठी हे खूप वाईट होईल.’

‘उपग्रहाद्वारे इंटरनेट उपलब्ध करून दिल्याबद्दल लोक त्याचे अभिनंदन करत आहे. हा आहे नवीन पाकिस्तान आणि हे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री, असं अजून एका वापरकर्त्याने सांगितलं. अशा प्रकारे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतं आहे.


हेही वाचा – #ShameOnGautamGambhir: जिलेबी खाणं पडलं गंभीरला महागात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -