दहशतवादी नेपाळमार्गे भारतात करतात घुसखोरी

पाकिस्तान आता नेपाळ बॉर्डरमार्गे दहशतवाद्यांना भारतात पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतीय लष्करही घुसखोरांना रोखण्यासाठी पूर्ण तयारीत आहे.

Jammu Kashmir
pakistan sending terrorists through nepal border
दहशतवाद्यांची घुसखोरी

जम्मू – काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भ्याड हल्ल्यानंतरही भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण पसरले आहे. भारतीय लष्कर देखील घुसकोरांना रोखण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. मात्र, असे असताना देखील पाकिस्तान दहशतवाद्यांना लागोपाठ भारतात घुसखोरी करण्यासाठी नवनव्या मार्गांचा वापर करीत आहेत. गुप्तचर विभागाच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान आता नेपाळ बॉर्डरमार्गे दहशतवाद्यांना भारतात पाठवत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, तीन दहशतवादी नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करण्यात यशस्वी ठरले आहेत.

घुसखोरी करून तिन्ही दहशतवादी उत्तर काश्मीरमधल्या बांदिपोरात दाखल झाले आहेत. त्या दहशतवाद्यांना बांदिपोऱ्यात पोहोचवण्यासाठी साजिद मीर ऊर्फ हैदर नावाच्या दहशतवाद्याने मदत केल्याची माहिती समोर आली आहे. साजिद मीर ऊर्फ हैदर हा दहशतवादी सोपोरमध्ये सक्रिय असून तो आपल्या इतर साथीदारांबरोबर नेपाळच्या काठमांडूमध्ये दाखल झाला होता. तिकडून त्याने तीन दहशतवाद्यांना बरोबर घेऊन बांदिपोरा गाठले आहे.

बर्फवृष्टी होत असताना दहशतवादी घुसखोरी करतात

गेल्या दोन वर्षांत नेपाळमार्गे दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केल्याच्या घटना समोर आलेल्या नव्हत्या. यावर्षी पहिल्यांदाच नेपाळमार्गे दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याचा एक नवीन मार्ग सापडला आहे. एप्रिल महिन्यात पाकिस्तानने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. तर दुसरीकडे बर्फवृष्टी होत असताना दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे समोर आले आहे.


वाचा – अखेर भारताचा विजय; मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित