घरदेश-विदेशखिडकी नसल्यामुळे काढून दिले खिडकीचे रेखाचित्र

खिडकी नसल्यामुळे काढून दिले खिडकीचे रेखाचित्र

Subscribe

प्रवाशाला खिडकी न मिळाल्या कारणाने एअर होस्टेसने चक्क खिडकीचे रेखाचित्र काढून तेथे चिकटवले

खिडकी जवळील जागा न मिळाल्यामुळे एका प्रवाशाने तक्रार केली तर एअर होस्टेसने एक मस्त उपाय सुचवून दिला. एअर होस्टेसने एका कागदावर खिडकीचे चित्र काढूण ते बाजूला चिपकवले.ही खोटी खिडकी ढग आणि महासागराच्या मोहक दृश्याने पूर्ण झाले. हे दृश्य खऱ्या खिडकी पाशी जागा मिळणाऱ्यांनाच मिळते.

एअर होस्टेसने हे चित्र काढल्यानंतर ते टेपने त्या प्रवाशाच्या बाजूस चिपकवले सुध्दा. जपानला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये ही घटना घडली. एका सहप्रवासीने या चित्राचा फोटो काढूण तो ट्विटरवर अपलोड केला. छायाचित्र अपलोड करताच हजारोने रिट्विट आणि लाइक्स मिळाले.

- Advertisement -

खिडकी पाशी जागा न मिळणयाचा ही पहिली घटना नव्हती. याआधी सुध्दा बऱ्याच प्रवाश्यांना हे हाल सोसावे लागले आहेत. #wheresmywindow ही हॅशटॅग निराशा व्यक्त करण्यासाठी खूप वेळा वापरली गेली होती. वरून पृथ्वीचे वैभवशाली आणि अबाधित दृश्ये पाहण्याची अपेक्षा घेऊन येणाऱ्या प्रवाशांसाठी हा खूप निराशाजनक अनुभव होता. एअरलाईन्स विमानामध्ये अधिक जागा करण्याच्या आंतरिक सुशोभिकरणामध्ये सीटच्या बाजूला खिडक्या येत नाहीत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -