घरदेश-विदेशमोदींनी चौकीदार शब्द हटवला

मोदींनी चौकीदार शब्द हटवला

Subscribe

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरील नावापुढील चौकीदार शब्द काढून टाकला आहे. परिणामी भाजपचे नेतेही लवकरच चौकीदार शब्द काढून टाकण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणूक जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटरवरील नावापुढील चौकीदार हा शब्द काढून टाकला आहे. संध्याकाळी सहानंतर मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील आपल्या नावापुढील चौकीदार शब्द हटवला. त्यामुळे आता भाजपचे इतर नेतेही आपल्या नावापुढील चौकीदार शब्द हटवण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

चौकीदार शब्द सामर्थ्यशाली ठरला

’चौकीदाराचे स्पिरीट प्रत्येक क्षणी जिवंत ठेऊया आणि भारताच्या विकासासाठी काम करूया. माझ्या ट्विटर अकाउंटवरुन मी चौकीदार शब्द हटवत आहे. पण तो माझा अविभाज्य घटक राहील. तुम्ही सर्वांनीदेखील तसेच करावे, ही मी विनंती करतो,’ असे मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मोदींनी दुसर्‍या एका ट्विटमधून देशातील जनतेचे कौतुक केले आहे. ’जनता चौकीदार झाली आणि त्यांनी देशाची सेवा केली. जातीयवाद, भ्रष्टाचार, भांडवलवाद यांच्यासारख्या राक्षसांपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी चौकीदार शब्द अतिशय सामर्थ्यशाली ठरला,’ असे मोदींनी त्यांच्या दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -