घरदेश-विदेशमोदी हिंदीत बोलले, मग बेअर ग्रिल्सला कसं कळायचं?

मोदी हिंदीत बोलले, मग बेअर ग्रिल्सला कसं कळायचं?

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. डिस्कव्हरी वाहिनीवरील हा भाग सर्वात जास्त पाहिला गेल्याचे सांगण्यात येत आहे. ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या प्रसिद्ध मालिकेचा सूत्रसंचालक बेअर ग्रिल्स असून त्याचा चाहतावर्ग जगभरात आहे. मोदींवर चित्रित केलेल्या भागात मोदीजी बेअरशी हिंदीत संवाद साधतात आणि त्याचे उत्तर बेअर इंग्लिशमध्ये देतो. मोदींचे हिंदी बेअरला कसे काय समजले? अशा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. याचे उत्तर आता खुद्द मोदींनी दिले आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी (२५ ऑगस्ट) रोजी रेडिओवरून देशातील जनतेशी ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलत असताना सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानामुळे मला बेअर ग्रिल्सशी बोलता आले.

“काही लोक मला म्हणाले की, बेअर ग्रिल्स सोबत तुम्ही हिंदीत संवाद साधत होता. बेअर ग्रिल्सहा हिंदी येत नाही. तरिही तो इतक्या जलद तुम्हाला उत्तर कसे काय देत होता?” याचे गुपित उघड करताना मोदी म्हणाले, ही सर्व तंत्रज्ञानाची कमाल आहे. मी हिदींत बोलल्यानंतर बेअर ग्रिल्स कानात असलेले कॉडलेस इन्स्ट्रूमेंट माझे वाक्य भाषांतर करुन बेअर ग्रिल्सला सांगायचे. त्यामुळे मी जरी हिंदीत बोलत असलो तरी बेअरला ते इंग्रजीत ऐकू जायचे. या डिव्हाईसमुळे आमच्या दोघांना संवाद साधणे अतिशय सोपे झाले होते.

- Advertisement -

मॅन व्हर्सेस वाईल्डचा हा भाग प्रदर्शित झाल्यानंतर मला जगभरातील तरुणांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया येत असल्याचेही मोदींनी सांगितले. मोदींवरील मॅन व्हर्सेस वाईल्डचा भाग १२ ऑगस्टरोजी प्रदर्शित करण्यात आला होता. या भागाचे चित्रीकरण उत्तराखंडमधील प्रसिद्ध जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात करण्यात आले होते. या भागात मोदींची निसर्गाविषयीची आत्मीयता आणि ओढ दाखवली गेली. तसेच बेअर ग्रिल्स सोबत त्यांनी नदीतून फिरणे, चालणे अशी साहसी कामे केली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -