घरदेश-विदेशकाँग्रेससाठी संरक्षण क्षेत्र कमाईचे साधन - मोदी

काँग्रेससाठी संरक्षण क्षेत्र कमाईचे साधन – मोदी

Subscribe

'सत्तेवर असताना काँग्रेसने अनेक वर्षे संरक्षण दलाचे आधुनिकीकरण होऊ दिले नाही', असा आरोपही मोदींनी यावेळी केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या सभेदरम्यान काँग्रेसवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. ‘संरक्षण क्षेत्र हे काँग्रेसच्या दृष्टीने केवळ खिसे भरण्याचं आणि सौदे करुन कमाई करण्यासाठी होतं’, असा थेट आरोप मोदींनी केला आहे. एका इंग्रजी दैनिकाने, पंतप्रधान कार्यालयाकने  ‘राफेल’ खरेदी व्यवहाराबाबत समांतर चर्चा केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याच धर्तीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर अनेक आरोप केले होते. त्यालाच प्रत्युत्तर देत मोदींनी पेरुमन्नालूर येथील सभेत काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. ‘सत्तेवर असताना काँग्रेसने अनेक वर्षे संरक्षण दलाचे आधुनिकीकरण होऊ दिले नाही’, असा आरोपही मोदींनी यावेळी केला.

संरक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष

याशिवाय काँग्रेसने समुद्रापासून – आकाशापर्यंत संरक्षणाशी संबंधित अनेक गैरव्यवहार केले असल्याचा आरोपही त्यांनी केला. सभेदरम्यान मोदी म्हणाले की, ‘वर्षांनुवर्षे ज्यांची देशावर सत्ता होती, त्यांनी संरक्षण क्षेत्राकडे कधी लक्ष दिले नाही. संरक्षण क्षेत्र हे त्यांच्या दृष्टीने केवळ सौदेबाजीचे माध्यम होते. आपल्या मित्रांनाही त्यांनी याचा फायदा करुन दिला.’ ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा संरक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे’, असा दावाही त्यांनी केला. ‘भारताने संरक्षण क्षेत्राच स्वयंपूर्ण व्हावे हे आमच्या सरकारचे स्वप्न आहे’, असे मोदी यावेळी म्हणाले.

- Advertisement -

आमच्या सरकारच्या चांगल्या कामामुळे काही लोकांना दु:ख होते. नंतर त्याचे रुपांतर निराशेत आणि मोदींच्या नावाने बोटे मोडण्यात होते, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले. ‘निवडणुका या कार्यक्रमावर लढविल्या जातात, टीका – टिप्पणीवर नव्हे’, असा टोला विरोधकांना हाणत ‘मी माझ्यावर केल्या जाणाऱ्या टीकांना गंभीरतेने घेत नाही’, असेही मोदी यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -